पावसाच्या सरींमध्येही देशभक्तीचा जल्लोष : बसमतनगर JNV विद्यालयात स्वातंत्र्य दिन सोहळा
“गवई सरांच्या प्रेरणादायी संदेशाने भारावले विद्यार्थी – JNV नवोदय विद्यालय बसमतनगर येथे स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात”
JNV बसमतनगर (प्रतिनिधी) :
“JNV नवोदय विद्यालय बसमतनगरात विद्यार्थ्यांनी जागवली देशभक्तीची भावना”
JNV जवाहर नवोदय विद्यालय, बसमतनगर येथे नुकताच १५ ऑगस्ट रोजी ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावर्षी राज्यभर १३ ऑगस्ट पासून पावसाचे प्रमाण जास्त असल्याने बसमतनगर परिसरातही जोरदार पाऊस पडत होता. मात्र, त्या पावसालाही विद्यार्थ्यांच्या देशभक्तीच्या जोशापुढे थांबावे लागले आणि सम्पूर्ण विद्यालय परिसर देशप्रेमाने उजळून निघाला.
प्राचार्यांच्या हस्ते ध्वजारोहण व राष्ट्रगीत
सकाळी ७:३० वाजता विद्यालयाचे प्राचार्य श्री. गवई सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहभागाने राष्ट्रगीताचे सामूहिक गायन झाले. परिसरातील ठिकाणी पाउस सुरु असल्या कारणाने मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम मैदानावर घेता आला नसला तरीही ध्वजारोहणानंतर सर्व विद्यार्थ्यांना मिष्ठान्न वितरित करण्यात आले.

JNV बसमत येथील स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाला सुरुवात
यानंतर ९:३० नंतर प्राचार्य महोदयांच्या अनुमतीने सांस्कृतिक कार्यक्रमास प्रारंभ झाला. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाची सूत्रसंचालनाची धुरा विद्यालयाचे शिक्षक श्री. कानडे सर यांनी जोशपूर्ण शैलीत सांभाळली. त्यांच्या ऊर्जावान शैलीमुळे उपस्थितांच्या मनात देशभक्तीचा ओघ वाढला.
JNV विद्यार्थ्यांची भाषणे : देशभक्तीची प्रेरणा
उपस्तित JNV विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व, त्याग व कर्तव्य यांवर आपले विचार मांडले.
कु. श्रुति गुट्टे हिने आपल्या ओजस्वी भाषणातून स्वातंत्र्य सैनिकांनी देशाकारिता दिलेल्या बलिदानाची आठवण करून दिली. तिच्या भाषानातुन असे जानवले की स्वातंत्र्य हा प्रत्येक भारतीयासाठी केवळ उत्सव नसून जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले.
मास्टर. मंथन वाकोडे याने इंग्रजी भाषणातून “India’s Contribution to the World” या विषयावर माहिती दिली. भारतातून जगाला दिलेले तत्त्वज्ञान, अनेक मोठ्या कम्पिनिचे सी इ ओ तसेच विज्ञान व आजच्या काळात भारतीय सीईओनी मिळवलेले यश यावर त्याने प्रभावी विवेचन केले.
कु. साक्षी खिराड़े हिने हिंदी भाषणातून “स्वतंत्रता का महत्व” स्पष्ट करताना आजच्या विद्यार्थ्यांची जबाबदारी तिने तिच्या शब्दातून अधोरेखित केली.
कु. गौरी सूर्यवंशी हिने सुद्धा ओजस्वी भाषण करत स्वातंत्र्य हा संघर्ष आणि त्यागाचा परिणाम असल्याचे अधोरेखित केले भगत सिंग, राजगुरु, सुखदेव यांच्या बलिदानाची अठावन करुण दिली. तिच्या शब्दांतून विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह संचारला.

JNV कार्यक्रमात देशभक्तिपर गीत व मास पी.टी. प्रस्तुती
स्वातंत्र्य दिनानिमित्त JNV तील वर्ग सहावीच्या विद्यार्थ्यांनी प्रथमच मास पी.टी.चे सुंदर सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे त्याना मार्गदर्शन शिक्षिका श्रीमती रेखा भगत व श्री. प्रशांत देवार्ड़े यांनी केले. विद्यार्थ्यांच्या एकसंध हालचालींनी विद्यालयाच्या भवनात एक आगळीच शिस्तबद्ध झलक दिसून आली ज्याने सर्व विद्यार्थ्यांची मने आकर्शिली गेली.
याशिवाय विद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी संगीत शिक्षिका सु.श्री. हेमलता इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली देशभक्तिपर गीतांचे सादरीकरण केले. “ऐ मेरे वतन के लोगों” आणि “वन्दे मातरम” सारखी गीते ऐकून संपूर्ण परिसर भारावून गेला.

JNV शिक्षकांचे संगीतमय प्रदर्शन
कार्यक्रमात विद्यालायाचे अंग्रेजी शिक्षक श्री. पुंड सर व संगीत शिक्षिका इंगले मैडम यांनीही देशभक्तीपर गीत गाऊन उपस्थितांचे मनोमन जिंकले. तसेच हिंदी शिक्षक श्री. अश्टुरे सर यानी सुद्धा आपल्या आवाजात उपस्तितांची मने जिंकली.
सांस्कृतिक कार्यक्रम : रंगतदार प्रस्तुती
या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटिका व सांस्कृतिक उपक्रम सादर करून स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाला रंगत आणली. या कार्यक्रमांमधून एकतेचा संदेश व देशाप्रति कर्तव्यभावना अधोरेखित झाली.

प्राचार्यांचा प्रेरणादायी संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य श्री. गवई सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की,
“स्वातंत्र्य हा फक्त आनंदाचा दिवस नाही, तर जबाबदारीची जाणीव करून देणारा दिवस आहे. अनेक योध्यानच्या बलिदानातुन आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यामुळ आपल्या कर्तृत्वातून, शिस्तीतून व ज्ञानातून आपण राष्ट्राला अधिक सक्षम करणे हीच खरी देशसेवा आहे.”
त्यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल युगातील जबाबदाऱ्या, पर्यावरण संवर्धन व समाजातील सकारात्मक योगदान याबद्दलही मार्गदर्शन केले.

आभार प्रदर्शन व हर घर तिरंगा रॅली
कार्यक्रमाचा समारोप श्री. शिवाजी घटकाम्बले सर यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. त्यांनी प्राचार्य, शिक्षकवृंद, विद्यार्थ्यांचा तसेच कर्मचारी वर्गाचा विशेष उल्लेख करून सर्वांचे आभार मानले.
यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहभागाने व प्राचार्य श्री. गवई सर यांच्या मार्गदर्शनाने ‘हर घर तिरंगा रॅली’ काढण्यात आली. विद्यार्थ्यांच्या घोषणांनी संपूर्ण वातावरण देशभक्तीमय झाले. या रॅली दरम्यान स्थानिक नागरिकानी सुध्दा यामध्ये अपला सहभाग दर्शविला व विद्यालयाची प्रशंसा केली. महत्वाची बाब म्हणजे पावसाच्या सरींमध्येही विद्यार्थ्यांचा उत्साह कमी झाला नाही. रॅलीमुळे परिसरात देशाभिमान व स्वातंत्र्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचला.
निष्कर्ष
एकंदरित, नवोदय विद्यालय बसमतनगर येथे स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा झाला. विद्यार्थ्यांची भाषणे, गीत-नृत्य, मास पी.टी., प्राचार्यांचे मार्गदर्शन आणि हर घर तिरंगा रॅली या सर्व उपक्रमांनी दिवस ऐतिहासिक ठरला.
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.
