|

JNV Hingoli “नवोदयच्या मंचावर नवोदितांचा आत्मविश्वास फुलला!” प्राच्यार्यानी दिली शाबासकीची थाप!

JNV Hingoli येथे नुतन विद्यार्थ्यांचे Morning Assembly प्रभावी सादरीकरण!

JNV Hingoli जवाहर नवोदय विद्यालय, हिंगोलीमध्ये 6 वीच्या विद्यार्थ्यांची पहिलीच Morning Assembly ठरली विशेष ! प्राच्यार्यानी दिली शाबासकीची थाप !

हिंगोली, ३१ जुलै २०२५

जवाहर नवोदय विद्यालय, बसमत हिंगोलीच्या परिसरात आज सकाळी एक प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरण पहायला मिळाले ज्यांचे कौतुक सर्व शिक्षक वर्गाकडून करण्यात आले. व याचे कारण ठरले नवागत इयत्ता 6 वीचे विद्यार्थी. विद्यालयात नुकतीच दाखल झालेल्या या विद्यार्थ्यांनी आपली पहिली शालेय Morning Assembly (प्रार्थना सभा) सादर करताना अपार आत्मविश्वास, शिस्तबद्धता आणि वैविध्यपूर्ण कला कौशल्य दाखवले.

या Morning Assembly मध्ये विद्यार्थ्यांनी विविध भाग सादर केले. दिवसाची सुरुवात Morning Assembly ने करण्यात आली.  ज्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र उभे राहून एकात्मतेचा संदेश दिला.

Morning Assembly सहावी च्या विद्यार्थ्यांचे कौशल्य प्रदर्शन

यानंतर विद्यार्थिनी कु. अनुष्का राउत व कु. दत्ता मो. वालवे ह्यानी Morning Assembly चे सूत्रसंचालन केले.

Morning Assembly ची सुरुवात

दि. ३० जुलाई रोजी कु. हनुमान सावंत तर ३१ जुलाई रोजी कु. तनिष्का हिने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ‘राष्ट्रीय प्रतिज्ञा’ सर्व विद्यार्थ्यांकडून घेतली. सर्वांनी एकसंध आवाजात प्रतिज्ञा म्हटल्यामुळे विद्यालयातील सभागृहात राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण झाली.

Morning Assembly एक प्रेरणादायी सुविचार सादर केला –

प्राजक्ता लोखंडे व यश कराळे या विद्यार्थ्यानी Morning Assembly मध्ये सुविचार सादर केला.

“स्वतःवर विश्वास ठेवा, कारण यशाचा पहिला टप्पा स्वतःवरचा आत्मविश्वास असतो.”

“Life Should Be Great Rather Than Long”

त्यांचा स्पष्ट उच्चार आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

Morning Assembly Presentation by Day Special

यानंतर, कु. समता धबळगे हिने व सुमेर दुट्टे ह्यानी ‘दिवसविशेष’ सादर करत आजच्या दिवशी घडलेल्या ऐतिहासिक घडामोडींचा आढावा दिला. यात ३१ जुलै बद्दलची माहिती माहिती देण्याचा प्रयत्न केला. तसेच भारताचे लोकप्रिय राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या बद्दल माहिती दिली. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यावर सादरीकरण केले. डॉ. कलाम यांचे बालपण, वैज्ञानिक कारकीर्द, राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ आणि तरुणांसाठी दिलेले संदेश अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आले.

Morning Assembly Todays News Presentation JNV Hingoli

‘आजच्या बातम्या’ याबद्दल कु. श्लोक माहेश्वरी तसेच कु. संकृति काटकर हिने अत्यंत प्रभावी शैलीत बातम्या सादर केल्यात. दोघनिही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, हवामान अंदाज आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचा आढावा दिला. त्यांच्या निवेदनशैलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये समज आणि जिज्ञासाही निर्माण झाल्याचा अनुभव शिक्षकानी अनुभाविला.

School Morning Assembly Quiz JNV Hingoli

कार्यक्रमातील एक विशेष आकर्षण ठरले ‘सामान्य ज्ञान क्विझ’

याकरीता सार्थक खडसे तसेच गौरी आसुर या विद्यार्थ्यांकडून प्रार्थना सभेमध्ये रोचक प्रश्न विचारली गेली. उदाहरणार्थ –

“भारताचे संविधान तयार करण्यास किती वेळ लागला?”

“UNO चे पूर्ण रूप काय आहे?”

अशा प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती आणि ज्ञान वाढीस लागले.

या संपूर्ण असेंब्लीचे सूत्रसंचालन कु. अनुष्का राउत व कु. दत्ता मो. वालवे यांनी केले. दोघान्चेही समन्वय आणि स्पष्ट संवादशैली ही देखील कौतुकास्पद होती.

Morning Assembly Principal Shri. Gawai Sir Speech

कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य श्री. एस. जे. गवई सर यांनी विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले –

“या लहानग्या विद्यार्थ्यांनी पहिल्याच Morning Assembly मध्ये दाखवलेला आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि एकत्रित प्रयत्न बघता त्यांच्या यशाची खात्री वाटते. नवोदयमध्ये प्रवेश घेतल्यावर त्यांना इथे मिळणाऱ्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक वातावरणाचा पूर्ण उपयोग करून घ्यावा. शिक्षकवर्ग सदैव मार्गदर्शनासाठी तयार आहे. तुम्हा सर्वांना उज्ज्वल भविष्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा.”

विद्यालयातील Morning Assembly मध्ये सम्पूर्ण शिक्षकवर्ग यांची उपस्थिती होती. त्यांच्या माध्यमातुन देखिल या विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव पहावयास मिळाला.

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….

YouTube Subscribe Now
फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप 
व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप 
टेलिग्राम जॉईन करा
Share Chat जॉईन करा

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *