JNV Hingoli येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

JNV Hingoli येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रकल्प सादरीकरण

JNV Hingoli येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळच्या सभेत विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयावर भाषणे दिली व विविध विज्ञान प्रकल्पांचे सादरीकरण केले. प्राचार्यांचा प्रेरणादायी संदेश व साहू सरांनी मानले आभार.

JNV Hingoli येथे राष्ट्रीय विज्ञाग दिवसाचे आयोजन

JNV Hingoli येथे आज राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात तसेच विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सकाळच्या सभेमध्ये कार्यक्रमाच्या प्रारंभी सर सी. व्ही रमन यांच्या प्रतिमेस दीपप्रज्वलन करून विज्ञानाच्या महत्त्वावर प्रकाश टाकण्यात आला.

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयावर प्रभावी भाषणे सादर केली. तसेच आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे स्थान, व आधुनिक तंत्रज्ञानाची प्रगती तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

त्यासोबतच विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान प्रकल्पांचे सादरीकरण केले. पर्यावरण संरक्षण, ऊर्जा बचत, पाणी व्यवस्थापन आदी विषयांवरील मॉडेल्स आणि प्रयोगांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि संशोधन वृत्तीचे सर्वांनी कौतुक केले.

कार्यक्रमात अध्यक्षस्थानी असनारे विद्यालयाचे प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन अंगीकारण्याचे आवाहन केले. तसेच या प्रसंगी त्यांनी सांगितले की, विज्ञानामुळेच देशाच्या प्रगतीला गती मिळते आणि विद्यार्थ्यांनी संशोधनाची आवड जोपासावी.

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन विज्ञान विभागाचे प्रमुख श्री. जी. पी. पोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाचे शिक्षक श्री. साहू सर यांनी आभार प्रदर्शन केले. त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या शिक्षक, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व नवचेतना निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….

YouTube Subscribe Now
फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप 
व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप 
टेलिग्राम जॉईन करा
Share Chat जॉईन करा

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *