‘रक्तदान म्हणजे जीवनदान’ – नवोदय हिंगोलीचा समाजोपयोगी उपक्रम Organization of a Blood Donation Camp
२४ ऑगस्टला बसमतनगर नवोदय विद्यालयात होणार जीवनदानाचा महाउपक्रम Blood Donation Camp
Blood Donation Camp जवाहर नवोदय विद्यालय बसमतनगर, हिंगोली येथे भारताचे माजी प्रधानमंत्री व नवोदय विद्यालयाचे संस्थापकीय प्रणेते राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे Blood Donation Camp आयोजन.
हिंगोली (प्रतिनिधी) :
राजीव गांधी जयंतीनिमित्त नवोदय विद्यालयात भव्य रक्तदान शिबिर
देशाच्या जडन घडनित समाजसेवा, लोकहित आणि राष्ट्रभावनेला नेहमीच प्राधान्य देणारे जवाहर नवोदय विद्यालय बसमतनगर, हिंगोलीच्या वतीने यावर्षी एक विशेष सामाजिक उपक्रम राबविणार आहे. ज्यामध्ये भारताचे माजी प्रधानमंत्री आणि जवाहर नवोदय विद्यालायाचे संस्थापक म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यातील विद्यालयात रविवार दि. २४ ऑगस्ट २०२५ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम विद्यालय तसेच पालक सभेच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, त्यासाठी विद्यालय प्रशासन, शिक्षकवृंद तसेच पालक वर्ग उत्साहाने तयारी करत आहेत.
समाजोपयोगी उपक्रमाची गरज Why should one donate blood?
२१ व्या शतकातील आजच्या धावपळीच्या जीवनात रक्ताची कमतरता ही गंभीर समस्या बनत चालली आहे अथवा बनली आहे. समाजामध्ये अपघात, शस्त्रक्रिया, थॅलेसिमिया, प्रसुती तसेच गंभीर आजारांमध्ये रक्तदानाची गरज मोठ्या प्रमाणावर भासते. अशा वेळेला शाळा-विद्यापीठे, सामाजिक संस्था व स्वयंसेवी संघटना जर या बाबतिमध्ये पुढाकार घेत असतील तर समाजात नक्कीच जागृती घडून येते. आपल्याला माहिती आहे “रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे” तर या संकल्पनेतून नवोदय विद्यालयाने हा उपक्रम हाती घेतला असून तो निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
Blood Donation Camp कार्यक्रमाची रूपरेषा व वेळापत्रक (Time Table)
📅 दिनांक : २४ ऑगस्ट २०२५, रविवार
📍 स्थळ : शाळेचे सभागृह, जवाहर नवोदय विद्यालय, बसमतनगर, हिंगोली
Blood Donation Camp कार्यक्रमाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
⏰ सकाळी १०: ३० वाजता – प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व कार्यक्रमाची सुरुवात
⏰ सकाळी ११:०० वाजता – उद्घाटन समारंभ, दीपप्रज्वलन व मान्यवरांचे मार्गदर्शन
⏰ सकाळी ११:१५ वाजता – रक्तदान शिबिरास प्रारंभ (वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली)
⏰ दुपारी २:०० वाजता – अल्पोपहार व सहभागींना प्रमाणपत्र वितरण
⏰ दुपारी २:३० ते सायं. ४:०० – रक्तदान शिबिराचे पुढील सत्र
⏰ सायं. ४:३० वाजता – शिबिराची सांगता व आभार प्रदर्शन
Blood Donation Camp करीता आरोग्य विभागाचा सक्रिय सहभाग
या विशेष शिबिरासाठी जिल्हा आरोग्य विभाग तसेच स्थानिक शासकीय रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची विशेष टीम उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. रक्तदानासाठी आवश्यक असलेली सर्व वैद्यकीय उपकरणे, स्वच्छता व्यवस्था तसेच सुरक्षितता उपाय योजले गेले आहेत.
Blood Donation Camp करीता पालक व समाजाचा उत्स्फूर्त सहभाग
नवोदय विद्यालय व पालक सभेच्या पुढाकाराने होत असलेल्या या उपक्रमात अनेक पालक, शिक्षक, कर्मचारी तसेच माजी विद्यार्थी सहभागी होणार आहेत. विद्यालय प्रशासनातर्फे सर्व पालकांना आवाहन केले आहे की –
“आपला एक थेंब रक्त एखाद्या रुग्णाचे प्राण वाचवू शकतो. चला, आपण या जीवनदायी उपक्रमाचा भाग बनूया.”
शिबिराचे महत्त्व Blood Donation Camp Important
विद्यालय प्रशासन व पलक सभेच्या वतीने आयोजित केले जाणारे हे रक्तदान शिबिर केवळ एक कार्यक्रम न राहता एक सामाजिक संदेश ठरावा, हा विद्यालयाचा उद्देश आहे. या उद्देश्याने विद्यार्थ्यांना लहानपणापासून समाजकार्याचे महत्त्व पटावे, ‘रक्तदान म्हणजे जीवनदान’ ही भावना त्यांच्या मनामध्ये रुजावी आणि त्यांची हातून समाजाशी जोडलेले कार्य घडावे, याकरिता हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरेल.
निष्कर्ष
राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त घेतलेला हा उपक्रम त्यांच्या आधुनिक, प्रगत व लोकहितकारी भारताच्या स्वप्नाला साजेसा आहे. समाजात जागरूकता निर्माण करून मानवतेची सेवा हीच खरी राष्ट्रसेवा आहे. हा संदेश देण्यास हे शिबिर महत्त्वाची भूमिका बजावेल.
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.
