Karuna Global Foundation तर्फे नागपुरात शिवजयंती उत्साहात साजरी
Karuna Global Foundation, नागपूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिव पूजन, दीप प्रज्वलन, अभिवादन तसेच भोजनदानाचा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. समाजसेवा व प्रेरणादायी कार्यासाठी फाउंडेशन सातत्याने कार्यरत!
Karuna Global Foundation तर्फे नागपुरात शिवजयंती सम्पन्न!
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती नागपूर येथील सामाजिक संस्था करूणा ग्लोबल फाउंडेशन, प्रतापनगर कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन तसेच दीप प्रज्वलन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले आणि शिवचरित्रावर विचार मंथन करण्यात आले यासोबतच यासारखे विविध उपक्रम पार पडले. या ठिकानी फाउंडेशनचे सचिव, सहसचिव, उपाध्यक्ष, समन्वयक तसेच स्वयंसेवक (Volunteers) यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अतिशय प्रेरणादायी ठरला.
शिवजयंतीची सुरुवात
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. यानंतर उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या शौर्य, प्रशासन कौशल्य व आदर्श नेतृत्वावर मार्गदर्शन केले. शिवचरित्राचे स्मरण करताना, शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

सामाजिक बांधिलकीचे दर्शन – भोजनदान उपक्रम
फाउंडेशनच्या वतीने शिवजयंती निमित्त परिसरातील गरजूंसाठी विशेष भोजनदानाचे आयोजन करण्यात आले. गरजू आणि निराधार लोकांसाठी या भोजनदान उपक्रमात शेकडो लोकांनी लाभ घेतला. या कार्यात फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसह स्वयंसेवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

Karuna Global Foundation समाजसेवेसाठी एक कटिबद्ध संस्था
करूणा ग्लोबल फाउंडेशन ही 2020 पासून विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली एक नामांकित NGO आहे. आरोग्य सेवा, महिला सक्षमीकरण, बालशिक्षण, वृद्धाश्रम मदत, निसर्ग संवर्धन, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, कोरोनाकाळातील मदतकार्य अशा अनेक क्षेत्रांत फाउंडेशनने उल्लेखनीय योगदान दिले आहे.
संस्थेच्या वतीने महापुरुषांच्या जयंती उत्सवाचे आयोजन, वृक्षारोपण, गरिबांसाठी ब्लँकेट व अन्नदान उपक्रम हे सातत्याने राबविले जातात. अशा सामाजिक उपक्रमांमुळे करूणा ग्लोबल फाउंडेशन नागपूर व परिसरात सामाजिक परिवर्तनाचा एक महत्त्वाचा घटक ठरली आहे.
समाजसेवा आणि प्रेरणादायी उपक्रमांची परंपरा
करूणा ग्लोबल फाउंडेशन सामाजिक बांधिलकी जपत, शिवरायांच्या विचारांप्रमाणे सर्वसमावेशक आणि न्यायसंगत समाजाच्या उभारणीसाठी कार्यरत आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आगामी काळातही असे अनेक उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला.
शिवजयंतीचा संदेश – राष्ट्र उभारणीसाठी प्रेरणा
छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समाजहितासाठी प्रेरणादायी आहे. करूणा ग्लोबल फाउंडेशनच्या या उपक्रमातून सामाजिक एकोपा, राष्ट्रनिष्ठा आणि सेवा वृत्तीचा संदेश दिला गेला. समाजसेवेसाठी समर्पित अशा संस्थांच्या प्रयत्नांमुळे शिवरायांचे विचार आजही जिवंत राहतात!
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

One Comment