Kunal Kamra प्रकरण: शिवसेना नेत्यांचा संताप, 31 तारखेला मुंबईत पोलिसांसमोर राहणार हजर

“कॉमेडियन Kunal Kamra प्रकरणात शिवसेना नेत्यांचा संताप उफाळला. विडंबनात्मक गाण्यावरून दाखल गुन्ह्यानंतर कामरा 31 तारखेला मुंबई पोलिसांसमोर हजर होणार. वाचा संपूर्ण बातमी.”

  1. Kunal Kamra प्रकरण : ट्रांजिट जामीनानंतर आता मुंबईत हजेरी

Kunal Kamra संदर्भातील प्रमुख ठळक मुद्दे:

Kunal Kamra चा अटकपूर्व जामीन: काही दिवसांपासुन चर्चेत असनारा Kunal Kamra हा कोमेडियन त्याने एकनाथ शिंदे यांच्यावरील केलेल्या वक्तव्यामुळे तो वादात सापडला आहे व त्यामुळे त्याच्यावर गुन्हे दाखाल करण्यात आलेले आहेत व त्याला अ‍टक होणार कि काय अशी चर्चा रंगली असताना त्याला मद्रास हायकोर्टाकडून 7 एप्रिलपर्यंत ट्रांजिट अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलेला आहे.

परंतू Kunal Kamra याने 31 मार्च रोजी मुंबईतील खार पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच त्याच्या विवादाचे कारण असे कि, त्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक व्यंगात्मक गाणं तयार केल्यामुळे Kunal Kamraवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या या गाण्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी थर्ड डिग्रीचा इशारा देत Kunal Kamra ला उग्र प्रतिक्रिया दिली आहे. व त्याच्यावर विधान परिषदेच्या सभापतींनी कामरा विरोधात हक्कभंग प्रस्ताव एका समितीकडे पाठवला आहे.

  1. Kunal Kamra प्रकरणाचा संपूर्ण आढावा!

हिंदी क्षेत्रातील प्रसिध्द कॉमेडियन कुणाल कामरा यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक गाणं तयार केलं व ते एका कार्यक्रमाध्ये गायले त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये उद्रेक पहायला मिळाला व त्याच्यावर मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. यासंदर्भात कामराला दोनदा समंज बजावण्यात आलं होतं, परंतु अटकेच्या भीतीने त्यांनी मद्रास हायकोर्टामध्ये धाव घेतली.

व त्यानंतर हायकोर्टाने कामराला 7 एप्रिलपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला असून, कामराला 31 मार्चला त्यांना मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर त्याच्याविरुध्द असनारी कायदेशीर प्रक्रिया सुरू राहणार आहे.

  1. Kunal Kamra विरुध्द शिवसेनेची प्रतिक्रिया

कामराने केलेल्या वक्तव्याबद्दल शिंदे गटाच्या नेत्यांनी कामराच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिंदे गटाच्या काही मंत्र्यांनी तर थर्ड डिग्रीचा इशारा सुध्दा दिला आहे. यासोबतच शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी कामराच्या शोचे ज्याठिकानी आयोजन करण्यात आले होते त्या हॉटेलमध्ये तोडफोड देखील केली, व भारी प्रमाणात नुकसान केले.

Kunal Kamra चे पुढे काय होईल ?

31 मार्चला Kunal Kamra पोलिसांसमोर हजर राहिल्यानंतर त्यापुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होईल. आता या प्रकरणावर संपूर्ण राज्यासोबतच देशाचे लक्ष लागले आहे.

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा….

YouTube Subscribe Now
फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप 
व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप 
टेलिग्राम जॉईन करा
Share Chat जॉईन करा

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *