माघ पौर्णिमा का आहे बुद्ध धम्मात इतकी महत्त्वाची? जाणून घ्या सविस्तर Buddha Dhamma
माघ पौर्णिमा : गौतम बुद्धांच्या जीवनातील पवित्र दिवस | Buddha Dhamma
माघ पौर्णिमा : Buddha Dhamma तथागत गौतम बुद्धांच्या जीवनातील पवित्र आणि ऐतिहासिक दिवस माघ पौर्णिमेचे महत्त्व जाणून घ्या. भगवान गौतम बुद्धांचे जीवन, सारीपुत्त-मोगलान यांचा गौरव, भिक्कू संघ, अष्टशील व महापरिनिर्वाण यांची सविस्तर Buddha Dhamma माहिती.
Buddha Dhamma माघ पौर्णिमा चे महत्व
बौद्ध धम्मात पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण प्रत्येक पोर्निमेला बुद्धाच्या जीवनामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे जसेकी, तथागत गौतम बुद्धांचे जन्म, गृहत्याग, बुद्धत्व प्राप्ती, धम्मचक्र प्रवर्तन आणि महापरिनिर्वाण या सर्व घटना पौर्णिमेच्या दिवशी घडल्या आहेत. त्यामुळे पौर्णिमा हा दिवस बौद्ध उपासकांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या सर्व पौर्णिमांमध्ये माघ पौर्णिमा ही विशेष महत्त्वाची आहे.

Buddha Dhamma त पौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व
पौर्णिमा म्हणजे काय ? तर शुक्ल पक्षातील पंधरावा जो असतो त्याला पोर्णिमा म्हटले जाते. या दिवशी चंद्र पूर्ण तेजस्वी, शांत आणि शीतल असतो. अश्याप्रकारे पौर्णिमेचा चंद्र प्रसन्न, जागृत आणि परिपूर्ण जीवनाचे प्रतीक मानला जातो. पोर्निमेचा चंद्रप्रकाश मन शांत करणारा, ध्यानसाधनेस पोषक आणि आनंददायी असतो. म्हणूनच बौद्ध जीवनपद्धतीत पौर्णिमा हा सत्कार्यासाठी पवित्र दिवस मानण्यात आला आहे.
बुद्ध जीवन Buddha Dhamma आणि पौर्णिमेचा असणारा संबंध
तथागत भगवान गौतम बुद्धांचे संपूर्ण जीवन पौर्णिमेशी जोडलेले आहे असे आपल्याला दिसते. कारण
- पौर्णिमेलाच सिद्धार्थ गौतमांचा जन्म झाला,
- पोर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा विवाह झाला.
- पौर्णिमेलाच सिद्धार्थ गौतामानी गृहत्याग केला.
- पौर्णिमेलाच सिद्धार्थ गौतामाला बुद्धत्व म्हणजेच (ज्ञानप्राप्ती) झाली.
- पौर्णिमेलाच बुद्धानी सारनाथ येथे धम्म प्रचाराचा प्रारंभ केला.
- पोर्णिमेला बुद्धानी अनेक राजाना धम्म दीक्षा अथवा धम्मौपोदेश दिला.
- आणि पौर्णिमेलाच तथागत भगवान गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाण झाले.
या सर्व घटना बुद्धाच्या जीवनामध्ये पोर्णिमेला घडल्या आहेत त्या कारणामुळे प्रत्येक पौर्णिमा बौद्धांसाठी श्रद्धेचा आणि स्मरणाचा दिवस आहे.

माघ पौर्णिमेचे Buddha Dhamma त ऐतिहासिक महत्त्व काय आहे ?
याच पोर्णिमेला म्हणजेच माघ पौर्णिमेला तथागत गौतम बुद्धांनी त्यांच्या आवाडत्या नगरात म्हणजेच वैशाली नगरात ४५ वा वर्षावास पूर्ण केला. व याच पोर्णिमेच्या दिवशी त्यांनी आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली होती.
माघ पोर्णिमेच्या दिवशी १२५० अरहंत भिक्कू कोणतीही पूर्वसूचना न देता एकत्र जमले होते. ही सभा बौद्ध इतिहासातील अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. त्यामुळे माघ पौर्णिमेला Buddha Dhamma त बुद्ध पौर्णिमेइतकेच महत्त्व प्राप्त झाले आहे.
माघ पोर्निमेचे महत्व सारीपुत्त आणि मोगलान : प्रमुख धम्म सेनापती म्हणून बुद्धाची घोषणा
माघ पौर्णिमेच्या दिवशी तथागत भगवान गौतम बुद्धांनी धम्माचे सेनापती म्हणून आर्य सारीपुत्त, आणि आर्य मोगलान या दोघांना भिक्कू संघाचे प्रमुख धम्म सेनापती म्हणून घोषित केले. म्हणून या पोर्णिमेला हे सुद्धा एक महत्व आहे.
आर्य सारीपुत्त यांच्या बद्दल माहिती
सारीपुत्त हे Buddha Dhamma त प्रज्ञेचे सर्वोच्च प्रतीक होते. बुद्धांनंतर प्रज्ञेच्या क्षेत्रात त्यांचे स्थान सर्वश्रेष्ठ होते असे मानले जाते. तर त्याना चार आर्यसत्यांचे स्पष्ट विवेचन करण्याची विलक्षण क्षमता त्यांच्याकडे होती. म्हणूनच त्यांना “अनुबुद्ध” म्हणजेच दुसरे बुद्ध असेही म्हटले जाते.
आर्य मोगलान यांच्या बद्दल माहिती
बुद्धाचे द्वितीय भिक्षु मोगलान यांना अलौकिक परामानसिक शक्ती प्राप्त होत्या असे मानले जाते. संघासाठी सेवा, शिस्त आणि प्रेरणा देण्यात मोगालाना यांचा फार मोठा वाटा होता. बुद्धांनी या दोघांना संघाचे आधारस्तंभ मानले.
Buddha Dhamma त भिक्कू संघासाठी विनय (आचारसंहिता) काय आहेत ?
याच माघ पौर्णिमेला बुद्धाच्या भिक्कू संघा करीता विनय पिटक म्हणजेच नियमावली निश्चित करण्यात आली. याच वेळी भगवान बुद्धांनी अत्यंत संक्षिप्त पण प्रभावी उपदेश दिला जो खलील प्रमाने आहे,
- “कोणतेही पापकर्म करू नये,
- नेहमी पुण्यकर्म करीत राहावे,
- आणि आपल्या चित्ताची परिशुद्धी करावी.”
हा भगवान बुद्धाचा उपदेश आजही बौद्ध धम्माचा सार मानला जातो.
महापरिनिर्वाणाची घोषणा भगवान गौतम बुद्धानी कधी केली ?
ज्या वेळी बुद्ध वैशाली येथे होते तेव्हा बुद्धांनी भिक्कू आनंदाला सांगितले की तीन महिन्यांनंतर तथागतांचे महापरिनिर्वाण होईल. तो दिवस म्हणजे माघ पोर्णिमा म्हणून या पोर्णिमेला विशेष असे महत्व आहे, वयाच्या ८० व्या वर्षी बुद्धांनी आपले कार्य पूर्ण झाल्याचे सांगितले. त्यांनी आपल्या शिष्यांना धम्मात पारंगत करून, मार्गदर्शन करून अंतिम विश्रांती स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
तथागत भगवान गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाण कोठे झाले ?
साधारणता में महिन्यात येणार्या वैशाख पौर्णिमेला, उत्तर प्रदेशातील कुशीनगर (कुशीनारा) येथे शाल वृक्षांच्या उपवनात रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी भगवान गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले. हा क्षण बौद्ध इतिहासातील सर्वात भावपूर्ण आणि पवित्र क्षण मानला जातो.
माघ पौर्णिमा आणि उपोसथ व्रत कसे करावे ?
माघ पौर्णिमेला बौद्ध धर्मीय मोठ्या संख्येने—
त्रिसरण, अष्टशील, उपोसथ व्रत, कुठल्याही भिक्शुची धम्मदेसना तसेच बुध्द चरित्र वाचावे व् त्याचे पालन करावे.
अष्टशीलाचे नियम कोणते आहेत ?
- अहिंसा
- चोरी न करणे
- लैंगिक शुचिता
- सत्य बोलणे
- नशापासून दूर राहणे
- विकाल भोजन वर्ज्य
- नृत्य-गायन व भोग टाळणे
- अलंकार व शोभा टाळणे
निष्कर्ष
माघ पौर्णिमा हा केवळ एक धार्मिक दिवस नसून तो धम्म, करुणा, प्रज्ञा आणि मुक्तीचा मार्ग दाखवणारा पवित्र पर्व आहे. भगवान बुद्धांच्या जीवनातील या दिव्य घटनांचे स्मरण आपल्याला शांत, नैतिक आणि जागृत जीवन जगण्याची प्रेरणा देते.
नमो बुद्धाय
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.
