Mahaparinirvan Din Speech In Marathi
Mahaparinirvan Din Speech In Marathi: महापरिनिर्वाण दिन भाषण: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर प्रभावी मराठी निबंध आणि 10 महत्त्वाचे मुद्दे
Mahaparinirvan Din Speech In Marathi: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रभावी मराठी भाषण, निबंध आणि 10 महत्त्वाचे मुद्दे. शिक्षण, संविधान आणि सामाजिक समतेवरील विचार.
महापरिनिर्वाण दिन भाषण मराठीमध्ये | डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध
केवळ भारताच्याच नाही तर जगाच्या इतिहासातील काही तेजस्वी व्यक्तिमत्त्वांमुळे आपल्या भारतीय समाजाची दिशा बदलली. त्यात सर्वात महान नाव म्हणजे बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
आपल्याला महितच आहे दरवर्षी ६ डिसेंबर हा दिवस त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महापरिनिर्वाण दिन (महाप्रयान दिन) म्हणून देशभर पाळला जातो.

महापरिनिर्वाण (महाप्रयाण) दिन का पाळला जातो?
या दिवशी म्हणजेच ६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांनी या जगाचा निरोप घेतला.
“महापरिनिर्वाण” (महाप्रयाण) हा बौद्ध धम्मातील शब्द असून आत्म्याच्या अंतिम मुक्तीचा तो संकेत आहे असे मानले जाते.
हा दिवस केवळ या युगपुरुषाच्या स्मरणाचा नाही, तर त्यांच्या विचारांचे व् कार्याचे अनुकरण करण्याचा दिवस आहे.
महापरिनिर्वाण दिन भाषण (Short & Powerful)
माननीय मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग आणि माझ्या प्रिय मित्रांनो,
आज आपण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथे एकत्र आलो आहोत हे आपल्या सर्वाना माहितच आहे. या युगपुरुषाने केलेल्या कार्याचा व् त्यागाचा तसेच समाजासाठी देशासाठी केलेल्या असामान्य कर्तुत्वाला उजाला देणारा त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिन आहे.
डॉ. आंबेडकर — एक विचार, एक प्रेरणा
बोधिसत्व डॉ बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व म्हणजे धैर्य, जिद्द आणि ज्ञानाचे मूर्तिमंत उदाहरण आहे असे आपल्याला त्यांचे वाचन करताना लक्षात येत.
ते केवळ एक समाजसुधारक नव्हते, तर भारतातील सामाजिक परिवर्तनाचे, आधुनिक भारताचे व् भारतीय समाजाचे मुख्य शिल्पकार होते.

डॉ. आंबेडकरांचे प्रमुख योगदान
1 शिक्षणाचा मंत्र — “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा”
केवळ शिक्षण आणि शिक्षणाच्या बळावरच समाज उभा राहू शकतो, यावर त्यांनी त्यांच्या आयुष्यात सर्वाधिक भर दिला.
2 भारतीय संविधानाचे निर्माता
स्वतंत्र भारताच्या परिवर्तनाच्या भुमिकेमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महत्वाचा वाटा आहे, भारतीय संविधानातील प्रत्येक कलमात त्यांची दूरदृष्टी दिसून येते. भारतीय संविधानामध्ये त्यांनी अंतर्भूत केलेले लोकशाही, समानता, बंधुता आणि स्वातंत्र्य यांचा पाया त्यांनी रचला.
3 सामाजिक विषमतेविरुद्ध लढा
देशामध्ये हजारो वर्षापासून सुरु असनार्या जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्यायाविरुद्ध त्यांनी सम्पूर्ण आयुष्यभर झुंज दिली व् देशामध्ये समता प्रस्तापित करान्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा आहे.
4 महिला सक्षमीकरणात महत्त्वपूर्ण भूमिका
देशामध्ये जातीयता अनिष्ट प्रथा परंपरा सुरु असताना देशातील स्रियांचे जीवन देखिल हलाखीचे होते यावर मात म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिलद्वारे त्यांनी महिलांना वारसा, विवाह व स्वातंत्र्याचे व् समानतेचे हक्क मिळवून दिले.
5 बौद्ध धम्माचा स्वीकार
जगामध्ये ज्या ज्या महत्वाची क्रांति घडलेल्या आहेत त्यामध्ये एका क्रांतीचा उल्लेख हा प्रखार्शाने करावा लागेल व् ते म्हणजे समता आणि मानवी मूल्यांसाठी बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारला. त्यांचा हा निर्णय समाजातील अनेकांसाठी प्रकाशाचा दीप ठरला.
निष्कर्ष
महापरिनिर्वाण दिन (महाप्रयाण दिन) हा बाबासाहेबांच्या विचारांची आठवण करून देणारा दिवस आहे.
त्यांच्या शिकवणुकीनुसार जीवन जगणे आणि समानतेवर आधारित भारत घडवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
जय भीम! जय भारत!

महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाषणासाठी 10 महत्त्वाचे मुद्दे
- ६ डिसेंबर — महापरिनिर्वाण दिन
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
- “महापरिनिर्वाण” शब्दाचा अर्थ
- शिक्षणाचे महत्त्व
- भारतीय संविधानाची निर्मिती
- जातिभेदाविरुद्ध संघर्ष
- महिला सक्षमीकरण
- बौद्ध धर्म स्वीकारण्यामागील कारणे
- आधुनिक भारताच्या निर्मितीत बाबासाहेबांचे योगदान
- समानतेच्या भारतासाठी प्रेरणादायी आवाहन
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.
