|

कोण ठरणार महाराष्ट्राचा किंग मेकर ?

कोण ठरणार महाराष्ट्राचा किंग मेकर ?

एक्झिट पोल मध्ये आपण या ठिकाणी पाहतोय की महाविकास आघाडीला 60 ते 120 जागा दाखवण्यात आलेल्या आहेत. हा अंदाज आहे एक्झिट पोलचा आहे महायुतीला 90 ते 140 आणि इतरांना 30 ते 50 जागा मिळतील हा अंदाज आहे. नक्कीच तर पोल डायरीचा हा एक्झिट पोल आपल्याला सांगन्यात आलेला आहे, तर वंचित आणि इतर पक्षाना सुध्दा २५+ जागा आपल्याला पहायला मिळ्त आहे त्यामुळे वंचित या निवडनुकीमध्यी नककिच ग़ेम चेंजर ठरते कि काय याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

या सर्व पक्षाना वरिल प्रमाणे जागा मिळण्याचा अंदाज आहे. नक्कीच तर राष्ट्रवादीच्या वाट्याला 18 ते 28 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी मधील घटक पक्ष जर पाहायचे झाले तर काँग्रेसच्या वाट्याला 28 ते 47 जागा मिळतील असा अंदाज या एक्झिट पोल मधून वर्तवण्यात आलाय तर शिवसेना ठाकरे गटाला 16 ते 35 जागा मिळण्याचा अंदाज आहे राष्ट्रवादी पवार गटाला 25 ते 3२ जागा मिळण्याचा अंदाज आहे वंचित आघाडीला २० जागा आणि इतरांना 12 ते 29 जागा मिळण्याचा अंदाज यामध्ये हे वर्तवण्यात आलेल आहे.

महाराष्ट्राचा एक्सिट पोल कुनाच्या बाजुने ?

तर एक्झिट पोलच्या आकडेवारी नंतर आता राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी होण्याची शक्यता आहे. निकालाला लागायला आनखी दोन दिवस बाकी आहेत. 23 तारखेला निकाल येणार आहे, आणि मुंबईतील तथा प्रमुख शहरातील  हॉटेल आता बुक होण्याची शक्यता आहे, निवडुन येनार्या उमेद्वारांची खबरदारी म्हणून सर्वच राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवण्याची शक्यता आहे. काल मतदान पार पडलं आणि आता 23 तारखेला निकाल लागेल त्यामुळे आता एक्झिट पोलच्या आकडेवारी नंतर कांटेकी टक्कर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आणि याच पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी होण्याची शक्यता आहे. आपल्या सर्वच उमेदवारांना हे राजकीय पक्ष हॉटेलमध्ये ठेवतील अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे. मुंबईतील त्याचबरोबर इतर ठिकाणचे हॉटेल देखील मोठ्या प्रमाणामध्ये बुक केली जात आहेत. आता सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख नेते खबरदारी घेताना दिसतायत.

महाराष्ट्र निवडनुकिवर कुनाचा किती परिणाम ?

महाराष्ट्र निवडनुकिवर कुनाचा किती परिणाम होऊ शकेल, ग्रामीण भागामध्ये एक तर शेतकरी आणि मराठा आंदोलन याचा परिणाम बऱ्यापैकी होताना दिसत आहे तर मराठवाडा आणि या भागामध्ये असं दिसतंय कि आरक्षानाचे हे मुद्दे जास्त महत्त्वाचे राहतील आणि तरीही सांगतो की महायुतीला यावेळी एक्सिट पोल मध्ये जास्त यश मिळवताना दिसत नाही आहे, तर वंचित फॅक्टर सुद्धा महत्वाचे ठरेल. असा आत्ता माझा अंदाज आहे.

वंचित बहुजन आघाडी किती जागेवर निवडुन येण्याची शक्यता आहे ?

ज्या ठिकाणी मागील निवडनुकिमध्ये वंचित दुसर्या स्थानावर होती तेथे यावेळेस वंचित नक्कीच पुढे राहताना अपल्याला दिसेल, जसेकि बुलढाना, मुर्तिजापुर, अकोट, वाशिम, कळमनुरी, तर यावेळेस येथे सुद्धा वंचित चे उमेद्वार पुढे राहताना दिसत आहेत नांदेड, दर्यापुर, धामनगाव, लातुर, सिंदखेड राजा,

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत किती टक्के मतदान झाले?

यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उच्च नमटका 65% मतदान झाले.

महाराष्ट्र 2024 च्या निवडणुकीचे परिणाम आता दोन दिवसांवर येऊन ठेवलेले आहेत. त्यामुळे सगळ्यांनाच आतुरता आहे या निवडणुकीत कोणाला किती जागा मिळू शकतील. यावेळेस या निवडणुकीमध्ये 65% टक्के मतदान झाले जे 1995 नंतर सर्वात उच्च टक्का मानला जात आहे तर यामध्ये गडचिरोली जिल्ह्यात 69.63% मतदान झालेले आपल्याला दिसून येते तर मुंबईत 54% टक्के मतदान झाले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोणाला किती आव्हान?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 20 नोव्हेम्बर पूर्ण झालेली आहे. ही निवडणूक निश्चितच वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे चर्चेत राहिलेली आहे तसेच या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी महायुती आणि वंचित बहुजन आघाडी हे नवीन मुद्दे घेऊन पुढे आलेले आपल्याला दिसतात त्यामुळे या निवडणुकीत कोणाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे तर या निवडणुकीमध्ये कोण गेम चेंजर ठरणार आहे किंवा किंग मेकर ठरणार आहे हे सुद्धा आपल्याला दोन दिवसांमध्ये दिसून येईल.

 निवडणुकीत महत्त्वाचे प्रचाराचे मुद्दे?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काही महत्त्वाचे प्रचाराचे मुद्दे आपल्याला दिसून येतात त्यामध्ये सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीने त्यांचा जाहीरनामा जाहीर केला होता जो जोशावा या नावाने प्रसिद्ध करण्यात आला त्यामध्ये आरक्षणाचे संरक्षण महिलांना 3000 पेक्षा जास्त रुपये देण्याची घोषणा नोकऱ्यांमध्ये तरुणांना एक लाख पेक्षा जास्त नोकरी देण्याची घोषणा वर्षांमध्ये तीन सिलेंडर मोफत देण्याची घोषणा शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्याची घोषणा मुस्लिमांना संरक्षण देण्याचे घोषणा असे बरेच मुद्दे वंचित ने उपस्थित केले आणि त्या मुद्द्यांना आपल्या जाहीरनाव्यात स्थान दिले.

तर महायुतीने लाडके बहीण योजनेअंतर्गत महिलांना थेट रक्कम देण्याचे आश्वासन दिले आहे तर महाविकास आघाडीने सुद्धा काही योजना जाहीर केल्या या सर्वांचे पडसाद निवडणुकीत निश्चितच पडताना आपल्याला दिसतील.

YouTube

Subscribe Now

फेसबुक ग्रुप

फेसबुक ग्रुप 

व्हाट्सएप ग्रुप

व्हाट्सएप ग्रुप 

 

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *