Weather Alert पुढील 6 दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अलर्ट; तुमच्या भागात किती धोक्याची शक्यता?

Table of Contents

Weather Alert राज्यात पुढील 6 दिवस जोरदार पावसाची शक्यता! अनेक जिल्ह्यात अलर्ट जारी; कसे राहील तुमच्या जिल्ह्याचे हवामान ?

महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन; पुढील 5 – 6 दिवस जोरदार पावसाचा इशारा Weather Alert, अनेक जिल्हे अलर्टवर राज्यात येत्या काही तासांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांसह पावसाचे आगमन होणार असल्याचे सांगितले जात आहे. हवामान खात्याच्या विभागानुसार पुढील पुर्ण आठवडाभर राज्यातील अनेक भागांमध्ये मध्यम ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

राज्यात पावसाळी प्रणाली सक्रीय झाल्याचा तज्ञांचा अंदाज Weather Alert

आताच्या घडीला राज्यामध्ये अनेक ठिकाणी वादळी पाऊस (Storm Systems) सक्रीय झाला असल्याचे तज्ञांकडून बोलले जात आहे. राज्यातील कोकण मार्गे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व कर्नाटकमार्गाद्वारे वार्यांची दिशा बद्लत चालली आहे याचाच परिणाम म्हणून पुर्ण राज्यभरामध्ये वीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवन्यात येत आहे.

राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे जोरदार पाऊस?

राज्यातील हवामान बदलामुळे अनेक जिल्ह्यातील वातावरनामध्ये याचा परिनाम पहावयास मिळत आहे ज्यामध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व उत्तर महाराष्ट्र येथील अनेक जिल्ह्यांना जोरदार पावसाचा फटका बसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ज्यामध्ये जिल्हानिहाय पावसाचा सविस्तर अंदाज खाली दिला आहे.

मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हवामान अंदाज Weather Alert:

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, चिपळूण, वडूज, इंदापूर, बारामती, करमाळा: या ठिकानी वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस येनार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच मराठवाड्यातील अहिल्यादेवी नगर, बीड, जामखेड, कडा, चौसाळ: या भागात विजांसह मध्यम ते जोरदार पाऊस तसेच काही ठिकाणी गारपिटीचा इशारा देन्यात आला आहे. व श्रीगोंदा, राहुरी, कर्जत, दोंड, राळेगाव परिसरात विजांसह गारपिटीचा धोका वर्तविण्यात आलेला आहे. यासोबतच राज्यातील लातूर, तुळजापूर, पेठ, बार्शी, पंढरपूर, उदगीर, अहमदपूर, परळी, केज भागामध्ये तुफानी पावसाची शक्यता, काही भागांत गारपीटीसह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

राज्यातील उत्तर महाराष्ट्र हवामान अंदाज

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, इगतपुरी, मालेगाव, मनमाड, वाडा, सिन्नर, निफाड, त्र्यंबक या भागान्मध्ये विजांसह जोरदार स्वरूपाचा पाऊस पडनार असल्याचे मत हवामान तज्ञानी व्यक्त केले आहे. सोबतच श्रीरामपूर, संगमनेर, गंगापूर, कोपरगाव, वैजापूर, येवला या भागात पावसासाठी अत्यंत पोषक वातावरण तयार होत असल्याचे बोलले जात आहे.

व पाथर्डी, अलकुटी, शिरपूर विजांसह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

Weather Alert विदर्भ व कोकण भागात हवामान अंदाज कसा राहील ?

अमरावती, उमरखेड, वाशिम, शेवगाव, माजलगाव, तसेच हिंगोली, चिखली, लोणार या भागामध्ये वादळी वाऱ्यांसह तुफानी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. व विदर्भातील नागपूर, व खांदेशातील जळगाव, सिल्लोड, पाचोरा इ. ठिकाणी पुढील काही दिवसात हवामानामध्ये बदल पहायला मिळनार आहे, व या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

कोकण किनारपट्टी हवामान अंदाज :

कोकणामध्ये देखील जोरदार पावसाची हजेरी लागणार असून या भागात वाऱ्याचा जोर अधिक असणार आहे.

राज्यात गारपिटीचा धोका कोठे?

राज्यामध्ये बीड, जामखेड, कडा, श्रीगोंदा, कर्जत, राहुरी, दोंड, राळेगाव, अहिल्यादेवी नगर, शिरपूर, निफाड या भागांमध्ये गारपिटीचा विशेष धोका वर्तवण्यात आलेला आहे. तसेच या भागांतील शेतकऱ्यांनी उभ्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात असे सांगण्यात आलेले आहे.

राज्यात मांसुनपुर्व पावसाची वेळ व कालावधी

मांसुनपुर्व पाऊस हा येत्या 12 ते 24 तासांमध्ये सुरू होणार असून त्याचा प्रभाव निदान 5 ते 6 दिवसांपर्यंत राहणार आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार 15 तारखेला पावसाचा जोर अधिक असून, विजांसह तुफान स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

हवामान विभागाकडून शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना !

राज्यभरातील हवामान बदलामुळे शेतकरी चिंतेत सापडला असुन, शेतकऱ्यांनी आपल्या भागातील हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन पुढील काही दिवसांत फवारणी, कापणी अथवा साठवणुकीचे नियोजन करावे. त्यासोबतच विजांच्या कडकडाटात शेतात जाणे टाळावे आणि जनावरांसाठी सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था करावी.

निष्कर्ष:

राज्यातील हवामानात मोठा बदल होत असून राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाळी वातावणाने जोर धरला आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहून हवामान खात्याचे अपडेट्स नियमितपणे पाहावेत. 17 तारखेपासून पावसाचा जोर अधिक राहणार असल्याने योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

[टीप]: तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नोंदवा – पुढील अपडेटमध्ये तुमच्या भागाचा हवामान अंदाज देण्यात येईल.

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….

YouTube Subscribe Now
फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप 
व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप 
टेलिग्राम जॉईन करा
Share Chat जॉईन करा

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *