Monsoon Update महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर! हवामान विभागाचा रेड अलर्ट, कुठल्या जिल्ह्यांत धोका?

राजभर पुढील काही तास धोक्याचे Monsoon Update हवामान विभागाने जारी केला रेड अलर्ट ! कुठल्या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा ?

संपूर्ण राज्यामध्ये हवामानात फार मोठा बदल झालेला त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी Monsoon Update वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावलेली आहे, यामध्ये अनेक ठिकाणी सुसाट हवेमुळे फार मोठी हानी पाहायला मिळत आहे तर हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील काही तास राज्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. काही जिल्ह्याला रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

पावसाचा तडाखा! पुढील काही तास धोकादायक, हवामान विभागाचा मोठा अलर्ट

राज्यात पावसाचा इशारा: राज्यातील कोकण क्षेत्रात येनारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये येत असनारे सातारा, सोलापूर, कोल्हापूरला या जिल्ह्याना हवामान विभागाने रेड अलर्ट तर पुणे, बीड, रायगडसह अन्य जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे.

नुकताच हवामान विभागाकडून राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आलेला असून प्रशासनामार्फत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Monsoon Update राज्यातील या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी:

हवामान कसे आहे विभागाच्या माहितीनुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यामुळे हवामान खात्याने या जिल्ह्याना रेड अलर्ट दिला असून त्यासोबत नागरिकांकरिता काही सुचना जारी करण्यात आलेल्या आहेत, प्रशासनाच्या म्हणन्यानुसार नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या जिल्ह्यांना Monsoon Update ऑरेंज अलर्ट:

राज्यातील इतर जिल्ह्यान्मध्ये जसे पुणे, बीड, नांदेड, हिंगोली, परभणी आणि रायगड या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. व अश्या वेळी स्थानिक पातळीवर पूरस्थिती निर्माण होऊ शकते म्ह्णून नागरिकानी सतर्क राहण्याचे आव्हाहन करण्यात आलेले आहे.

मुंबईसह काही भागांमध्ये येलो अलर्ट:

मुंबई शहर आणि इतर काही परिसरात काहीसा कमी पाऊस पडणार असून या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे, काही तासापुर्वी म्हणजेच एक दिवस आधी मुंबईला रेड अलर्ट होता, मात्र सध्याच्या स्थितीनुसार तो येलो अलर्टमध्ये परिवर्तित करण्यात आला आहे असे मत हवामान तज्ञानी व्यक्त केले आहे.

राज्यात कुठल्या भागात मुसळधार पावसाचा जोर कायम राहील ?

संपूर्ण महाराष्ट्रात सध्या जोरदार पावसाचे वातावरण तयार झाले असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस हे चित्र कायम राहण्याची शक्यता वर्तविन्यात आलेली आहे. प्रशासनाकडूनही नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विदर्भात कुठल्या भागात पावसाचा जोर राहनार ?

राज्यासह विदर्भातील बहुतांश सर्व जिल्ह्यामध्ये वादळी वार्यासह पावसाचा जोर कायम राहनार असुन यामध्ये विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाना व वाशिमच्या काही भागात येलो अलर्ट जारी केलेला आहे तर पुर्व विदर्भामध्येदेखील गडचिरोली, नागपुर, वर्धा या ठिकाणी पावसाचे प्रमाण पुढील काही दिवस जोर धरणार आहे तरि प्रशासनाच्या माध्यमातुन नागरिकांकरिता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….

YouTube Subscribe Now
फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप 
व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप 
टेलिग्राम जॉईन करा
Share Chat जॉईन करा

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *