मकर Sankranti एका सणाच्या अनेक परंपरा, जाणून घ्या राज्यनिहाय वैशिष्ट्ये
मकर संक्रांत भारतातील विविध राज्यांतील Sankranti सण व वैशिष्ट्ये
मकर संक्रांत Sankranti भारतात कुठे, कशी आणि कोणत्या नावाने साजरी होते? प्रत्येक राज्यातील खास परंपरा जाणून घ्या. सूर्याच्या उत्तरायणाचे स्वागत करणारा राष्ट्रीय उत्सव
प्रतिनिधी | देशवार्ता
मकर Sankranti संक्रांत : भारतातील विविध राज्यांतील सण व वैशिष्ट्ये
मकर संक्रांत हा भारत देशातील एकमेव असा सण आहे जो सूर्याच्या भौगोलिक खगोलशास्त्रीय हालचालींवर आधारित असून तो जवळपास प्रत्येकवर्षी १४ जानेवारीला देशाभारत साजरा केला जातो. या दिवशी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो असे मानले जाते आणि उत्तरायणास सुरुवात होते. कापणी, समृद्धी, दानधर्म आणि सामाजिक ऐक्य यांचे प्रतीक असलेला हा सण तसेच या दिवसाचे औचित्य साधून भारतातील प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या नावाने हा दिवस वेगवेगळ्या परंपरांनी साजरा केला जातो.

महाराष्ट्र Sankranti मकर संक्रांत – तिळगूळ व सौहार्दाचा सण
देशातील महाराष्ट्र राज्यात हा सन मकर संक्रांत म्हणजे तिळगूळ घ्या, गोड गोड बोला हा संदेश देऊन साजरा केला जातो. ह्या दिवशी तिळगूळ वाटणे, हळदीकुंकू, पतंग उडवणे आणि दानधर्म ही या सणाची विशेष वैशिष्ट्ये आहेत. या दिवसाला नवविवाहित स्त्रियांना विशेष मान दिला जातो.
गुजरात राज्यात Sankranti – उत्तरायण व पतंगोत्सव
गुजरातमध्ये Sankranti हां सन मकर संक्रांत म्हणजे उत्तरायण म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेला पतंगोत्सव गुजरात मधील अनेक शहरात प्रसिद्ध आहे जसेकी अहमदाबादसह गुजरात मधील संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा होतो. छतांवरून पतंग उडवणे ही त्या राज्यातील मुख्य परंपरा आहे.
पंजाब व हरियाणा येथील Sankranti – लोहडीचा उत्सव
पंजाब व हरियाण्यात या दोन राज्यामध्ये मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी लोहडी साजरी केली जाते. म्हणजेच शेकोटी पेटवून लोक नाच-गाणी करतात. हा सण त्या ठिकाणी रब्बी पिकांच्या कापणीचा आनंद म्हणून व्यक्त करन्यात येतो.
तामिळनाडू येथील Sankranti – पोंगल (चार दिवसांचा उत्सव)
तामिळनाडू राज्यामध्ये मकर संक्रांत पोंगल म्हणून साजरा केला जातो त्या ठिकाणी हा सन तब्बल चार दिवस साजरा केला जातो. तसेच भोगी, थाई पोंगल, मट्टू पोंगल आणि कानूम पोंगल म्हणून ह्याला ओळखले जाते. सूर्यदेव, निसर्ग आणि पशुधनाचे पूजन हे या राज्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
आंध्र प्रदेश व तेलंगणा येथील Sankranti – संक्रांती (भोगी व कणुमा)
आंद्र तेलंगाना या राज्यांत सुद्धा संक्रांती तीन दिवस साजरी केली जाते. ज्यामध्ये भोगीला जुने सामान जाळणे, कणुमाला बैलांची पूजा व ग्रामीण खेळ हे विशेष आकर्षण असते.
कर्नाटक Sankranti – सुग्गी मकर संक्रांती
कर्नाटक राज्यात हा सण सुग्गी म्हणून ओळखला जातो. या दिवसामध्ये तीळ, ऊस, शेंगदाणे यांचे वाटप, तसेच रंगीबेरंगी रांगोळ्या व पारंपरिक खाद्यपदार्थ बनवले जातात.
आसाम राज्यातील Sankranti – माघ बिहू
आसाममध्ये मकर संक्रांत म्हणजे माघ बिहू म्हणून हां सन साजरा केला जातो. या ठिकाणी भातापासून बनवलेले पारंपरिक पदार्थ, सामूहिक मेजवानी व लोकनृत्य हे येथील याचे वैशिष्ट्य आहे.
बिहार व झारखंड राज्यातील Sankranti – खिचडी पर्व
बिहार व् झारखंड या भागात मकर संक्रांतीला खिचडी पर्व असे म्हणतात. या पर्वामध्ये तांदूळ, डाळींची खिचडी बनवून दान केली जाते. आणि या ठिकाणी नदीस्नानालाही विशेष महत्त्व आहे.
उत्तर प्रदेशातिल Sankranti – गंगा स्नान व दान
उत्तर प्रदेशात गंगा, यमुना यांसारख्या भारतामधिल विशेष नद्यांमध्ये पवित्र स्नान केले जाते, तसेच ह्या दिनाचे औचित्य साधून या राज्यात खिचडी व दानधर्म केला जातो. प्रयागराज, वाराणसी येथे मोठी गर्दी दिसते.
पश्चिम बंगाल येथील Sankranti – पौष संक्रांती
देशातील बंगालमध्ये हा सण पौष संक्रांती म्हणून ओळखला जातो. या राज्यात तांदूळ व गुळापासून बनवलेले पारंपरिक गोड पदार्थ हे मुख्य आकर्षण ठरतात.
राष्ट्रीय एकतेचे प्रतीक Sankranti सन
मकर संक्रांत हा सण विविधतेत एकता दर्शवतो. प्रत्येक राज्यातील नाव, पद्धत वेगळी असली तरी सूर्यपूजा, कापणीचा आनंद आणि सामाजिक सलोखा हा समान धागा संपूर्ण भारताला जोडतो.
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.
