Navoday Vidyalay बसमत येथे नववर्षाचे जल्लोषात स्वागत; सांस्कृतिक कार्यक्रमांनी दिला सकारात्मक संदेश
Navoday Vidyalay बसमत येथे नववर्ष स्वागत सोहळा | विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक सादरीकरण
हिंगोली येथील जवाहर Navoday Vidyalay बसमत, येथे २०२६ नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ज्यामध्ये ६ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या नाटिका, गीत व कवितांनी कार्यक्रमात नवचैतन्य निर्माण केले.
Navoday बसमत(हिंगोली): नववर्ष स्वागत सोहळा
जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय, बसमत या ठिकाणी नववर्षाचे स्वागत अत्यंत उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात करण्यात आले. या विशेष कार्यक्रमामध्ये इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतचे विद्यालयातील सर्व विद्यार्थी, तसेच नवोदय विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचारी तसेच नवोदय परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयोजित करण्यात आलेला नववर्षाचा हा स्वागत सोहळ्याची सुरुवात विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने झाली. या सम्पूर्ण कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी संस्कृती, सामाजिक मूल्ये व राष्ट्रप्रेमाचा संदेश देणारी नाटिका सादर केली. या नाटिकेमधून शिक्षणाचे महत्त्व, एकोप्याचे मूल्य आणि सकारात्मक विचारांची गरज प्रभावीपणे मांडण्यात आली.
यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षणाद्वारे समाजिकपरिवर्तनाचा संदेश देणारी गीते व शिक्षकांद्वारे प्रेरणादायी कविता सादर केल्या. विद्यालयातील या सादरीकरणामुळे कार्यक्रमस्थळी प्रेरणादायी व आनंददायी वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक केले.

प्रचार्य श्री. एस. जे. गवई यांचा विद्यार्थ्याना मोलाचा सन्देश
नववर्षाच्या कार्यक्रमा शेवटी अध्यक्षीय भाषण करताना विद्यालयाचे प्राचार्य श्री. एस. जे. गवई यांनी विद्यार्थ्यांना नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य, कष्ट आणि नैतिक मूल्ये आत्मसात करून उज्ज्वल भवितव्य घडवावे, असे मार्गदर्शन केले. तसेच १२ आणि बोर्डाच्या विद्यार्थ्याना पुढील स्पर्धात्मक जिवनाकारिता मोलाचा सन्देश दिला. तसेच त्यानी सुद्धा आपल्या आवाजात एक गीत सादर केले ज्याला विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
श्री. गायकवाड यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन
विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक श्री. गायकवाड सर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांचे (विभागाचे) आभार मानले. त्यांनी विद्यार्थ्यांचे परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याचे या ठिकाणी विशेष उल्लेख केले.
कार्यक्रमाचे पूर्व नियोजन
या संपूर्ण कार्यक्रमाची बैठकव्यवस्था, कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन विद्यालयातील इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांमार्फत यशस्वीपणे पार पाडण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमांची संपूर्ण जबाबदारी संगीत शिक्षक श्रीमती हेमलता इंगळे व त्यांच्या समूहाने उत्तम प्रकारे सांभाळली. तसेच मंच सजावट व कलात्मक रचना कला विभागातर्फे श्री. दत्ता सर यांच्या मार्गदर्शनाखाली आकर्षकपणे करण्यात आली होती. तसेच कार्यक्रमाची रूपरेखा सी.सी.ए विभाग श्रीमती. सरकार मैडम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
एकूणच, नववर्ष स्वागताचा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक जाणीवा, नेतृत्वगुण व संघभावना वाढवणारा ठरला. शैक्षणिक संस्थेमध्ये अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.
