JNV Hingoli येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना पुरस्कार व प्रमाणपत्रांचे वितरण
JNV Hingoli या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्राचार्याद्वारे पुष्पहार अर्पण, विद्यार्थ्यांची भाषणे, मार्गदर्शक विचार, निकाल जाहीर व पुरस्कार वितरण असा प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न झाला.
स्त्री शिक्षणाचा जागर : नवोदय विद्यालय हिंगोली येथे सावित्रीबाई फुले जयंती
जवाहर नवोदय विद्यालय (JNV Hingoli), हिंगोली येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे प्राचार्य श्री. एस. जे. गवई यांच्या हस्ते दीपप्रज्वल करून तथा सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रभावी सुत्रसंचालन विद्यालयाच्या इयत्ता आठवीची विद्यार्थिनी प्रगती शिंदे आणि श्रुति झोरे हिने केले. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी माता सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक व् शैक्षणिक कार्यावर आधारित मनोगत व भाषणे सादर केलीत त्यामध्ये प्रज्ञा सावंत कक्षा 9, इश्वरी लोमाटे कक्षा ७, हिने कविता सादर केली तर स्वराली पाटिल कक्षा ६, अर्चना शिंदे कक्षा 9, भाग्यश्री शेलके कक्षा 9, सानिका कक्षा ११, ह्या सर्व विद्यार्थिनिनी भाषण करत स्त्री शिक्षणाचे महत्त्व विशद केले त्यांच्या भाषनामधुन सावित्रीबाई च्या कार्याचा सर्वाना अभिमान वाटावा या शब्दात विद्यार्थ्यानी क्रान्तिज्योतिचे महत्त्व विषद केले.
सावित्रीबाई फुले जयंती निमित्त शिक्षक भाषण
विद्यालयाचे ग्रंथपाल श्री. शरद खंडारे यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतातुन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा सविस्तर आढावा घेत विद्यार्थ्याना या फुले दाम्पत्यानी केलेल्या कार्याची जाणीव करून दिली. तेव्हाच्या काळात या दाम्पत्यानी केलेला संघर्ष प्रत्येकानी डोळ्यापुढे ठेऊन आजच्या काळात सामाजिक बांधिलकी जपण्याची गरज असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच आज 21 व्या शतकात आपल्यापुढे ज्या समस्या उपस्तित होतील त्याला सामोरे जान्याकारिता आपण सदैव तत्पर असावे त्याकरिता मार्ग दाखवान्याचे काम हे महापुरुषांचे विचार करितील यात तिलमात्र शंका नाही.
प्राचार्य श्री. एस जे गवई यांचे अध्यक्षिय भाषण
कार्यक्रमाच्या समारोपाच्या आधी अध्यक्षीय भाषण म्हणून विद्यालयाचे प्राचार्य श्री. एस. जे. गवई यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानी आपल्या मनोगातातुन महात्मा फुले व् सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी जीवनात अंगीकारावा, असे आवाहन केले. त्यांच्या जिवनातील संघर्ष आपल्या जीवनात प्रेरणा म्हणून पहावे असे आव्हाहन त्यांनी विद्यार्थ्याना व् उपस्थित सर्वाना केले. यानंतर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. कानडे यांनी केले.

बालिका दिना निमित्त पुरस्कार वितरण समारोह
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतिचे औचित्य साधून विद्यालायत पार पडलेली PWT-3 परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत उत्कृष्ट पणे कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन प्राचार्य सरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच यानंतर ग्रंथालय विभागामार्फत आयोजित “राष्ट्रीय पुस्तक सप्ताह” अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांतील प्रतिभागी विद्यार्थी तथा त्यामध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना प्राचार्य श्री. एस जे गवई सरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करूण विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
हा संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करणारा व सामाजिक जाणीव वाढवणारा ठरला.
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.
