सत्ताधाऱ्यांची चिंता वाढली? प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक आयोगाविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावले
प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक आयोगाविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावले
महाराष्ट्रामध्ये निवडनुका पार पडल्या, सरकारही स्थापन झाले परंतु सामन्य जनतेला हा निकाल योग्य असा वाटला नाही त्यामुळे वंचित चे नेते प्रकाश अम्बेडकरानी देशात आणि राज्यात सर्वप्रथम आवज उठविला होता त्याचे सार्थक होताना दिसत आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सायंकाळी सहा वाजताच्यानंतर झालेल्या मतदानाच्या संदर्भात हि याचीका चेतन अहिरे यांच्या माध्यमातुन प्रकाश आम्बेडकरानी दाखल केली. याचिकेवर नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली या सुनावणी नंतर हायकोर्टाने महाराष्ट्र निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावलेली आहे. या नोटीसला दोन आठवड्यांमध्ये उत्तर द्यावं असे आदेश कोर्टाने दिलेले आहेत, आणि या सुनावणी दरम्यान स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी कोर्टात युक्तिवाद केला निवडणूक आयोगाने नियमावली पाळली नाही असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यामुळे या मुद्द्यावर सद्या सम्पुर्ण राज्यासह देशाचे लक्ष वेधले गेलेले आहे.
प्रकाश आंबेडकरांनी प्रसार माध्यमाना दिलेली माहिती
ते असे म्हणाले कि, इलेक्शनचे रिझल्ट्स डिक्लेअर करताना पोल वोट्स आणि काउंटर वोट्स यांची जुळवणी झाली पाहिजे यांची जुळवणी झाली नसेल तर मग रिटर्निंग ऑफिसर जे आहेत ते रिटर्निंग ऑफिसरनी तो सगळा दस्तावेज गोळा करुन इलेक्शन कमिशन कडे पाठवला पाहिजे आणि त्यानंतर इलेक्शन कमिशन जे डायरेक्शन देईल त्या डायरेक्शन प्रमाणे त्यांनी तो निकाल दिला पाहिजे. असे व्हायला पाहिजे होते.
जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सायंकाळी 6 नंतर वाढलेल्या 76 लाख मतांचा. ते म्हणाले 76 लाखांची जर तुम्ही विभागणी केली तर साधारण दीडशे मतदारसंघात व त्याच्यापुढे तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये 20 ते 25 हजार मत वाढवली आहेत असे आपल्या लक्षात येईल आणि प्रत्येक बूथवर 100 ते दीडशे मत वाढवली आहेत हा जो घोळ आहे. याचे उत्तर निवडनुक आयोगाने द्यावे .
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी जाहीर करताना काही मतदारसंघात तफावत आढळली होती. त्यावर वंचित बहुजन आघाडीने निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते. त्यानंतर इतरही राजकीय पक्षांनी आवाज उठवला होता. पण वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दाखल केलेल्या याचिकेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.
निवडनुक आयोगाला नोटीस
एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडनुकिसंदर्भात दाखल केलेल्या याचिकेची हायकोर्टानं दखल घेतली आहे. हायकोर्टानं केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांना नोटीस बजावली आहे त्यासोबतच प्रकाश अम्बेडकरानी दाखल केलेल्या याचीकेचे दोन आठवड्यात खुलासा सादर करावा असे निर्देशही कोर्टाकडनं दिले गेले आहेत. कोर्टाने दोन आठवड्याभर्याची मुदत निवडनुक अयोगाला दिलेली आहे.
प्रकाश आंबेडकरांचे एव्हीएम विरुध्द आंदोलन
गेल्या अनेक वर्षांपासुन वंचित चे राष्ट्रीय अध्यक्ष आद. प्रकाश अम्बेडकर हे एव्हीएम विरुध्द देशभर लढा देत आहेत त्यासोबतच नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडनुकीवर त्यानी सर्वप्रथम आक्षेप घेऊन एव्हीएम विरुध्द मोहीम सुरु केली त्यामध्ये त्यानी मुम्बई येथे मोर्चा काढला सोबतच राज्यभर स्वाक्षरी मोहीम सुरु केली होती ज्याला राज्यामधुन मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. त्याचाच पुढचा टप्पा म्हणेजे त्यानी न्यायालयात याचीका दाखल केली जो आज सम्पुर्न देशात गाजत आहे.
त्यांच्या या आन्दोलनानंतर राहुल गांधी यानी संसदेमध्ये बोलताना हा मुद्द उपस्थित केलेला आहे. त्यानी असे म्हटले आहे कि, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत 70 लाख नवे मतदार वाढले या वाढलेल्या 70 लाख मतदारांची माहिती जाहीर करावी अशी मागणी राहुल गांधी यानी लोकसभेत केली सोबतच त्यानी शिर्डीमध्ये एकाच इमारतीत 7000 नवे मतदार कसे नोंदवले गेले असा सवालही त्यांनी विचारला महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांमध्ये गडबड झाल्याचा आरोप संसदेत बोलताना राहुल गांधींनी केलाय. त्यामुळे प्रकाश अम्बेडकरानी सुरु केलेल्या अंदोलनाला आता गती मिळाल्याचे दिसत आहे.
पुढिल बातमीकरिता आजच आमच्य वेबसाईट्ला फॉलो करायला विसरु नका.
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.
