Pune स्वारगेट बस स्थानकातील धक्कादायक घटना ; सत्य आले समोर !
Pune Rape Case Swargate News
-
Pune बलात्कार प्रकरणाचा थरारक परिचय:
Pune Swargate येथील हि घटना 26 बेब्रुवारी रोजी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर 26 वर्षीय अश्विनीसोबत झालेली दुर्दैवी घटना जी सम्पुर्ण राज्याला सुन्न करनारी घटना आहे. त्या दिवशी सुमारे सकाळी 5:00 ते 5:30 ची वेळ पिडीता फलटणला जाण्यासाठी बसची वाट पाहत असताना आरोपी दत्तात्रेय गाडेने तिची दिशाभूल केली.
-
पुणे swargate प्रकरणात नेमके काय घडले त्याचा पुर्ण तपशील !
पीडीता फलटणला जाण्याकरिता बसची वाट पाहत होती, त्याठीकानी आरोपीने अश्विनीशी गोड बोलून तीचा विश्वास संपादन केला. त्याने तीला बस दुसरीकडे लागते असे सांगुन पिडीतेला चुकीच्या ठिकाणी बस असल्याचे सांगून एका बसमध्ये नेले. व त्याठिकानी बसमध्ये जाऊन पाहत असतानाच आरोपीने दरवाजा बंद करून तिच्यावर दोन वेळा बलात्कार केला. त्यानंतर आरोपी पळून गेला आणि अश्विनी धक्क्यात होती. ती काही वेळाने बसमधुन उतरुन घरी जायला निघाली व काही वेळाने तीने मित्राला फोन करुन सम्पुर्ण प्रकार सांगितला त्याने तिला सम्पुर्ण प्रकार पोलिसाना सांगण्याचा सल्ला दिला.
३. पिडीत अश्विनीची प्रतिक्रिया आणि तीने पोलिसांत केलेली तक्रार !
पिडीता जरी सुरुवातीला ती गोंधळून गेलेली असली, परंतू नंतर तिने मित्राला फोन करून आपल्यावर घडलेली आपबीती सांगितली. मित्राने तिला समजुन घेऊन तीला धीर दिला आणि पोलिसांत तक्रार देण्यास पिडीतेला प्रवृत्त केले. त्यानंतर पिडीता अश्विनीने पोलिस ठाण्यात जाऊन तीच्यावर घडलेला सर्व प्रकार सांगितला.
४. पोलिसांनी केलेला तपास आणि आरोपीचा इतिहास ?
पिडीतेची तक्रार दाखल करत तत्काळ कार्यवाही म्हणून पोलिसांनी स्वारगेट बसस्थानकाचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पुढील तपास करत आरोपीची ओळख पटवली. आरोपी दत्तात्रेय गाडे हा पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतील असून पोलिसांच्या म्हणण्यानुसार तो पूर्वीही गुन्ह्यात सामील होता असा आचर्यकारक दावा त्यानी केला. त्यानी दिलेल्या माहितीनुसार आरोपीवर सोनसाखळी चोरी आणि स्त्रियांवर अत्याचाराचे अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपी हा बस स्थानकांवर फिरून तो प्रवासी महिलांची फसवणूक करून दागिने चोरण्याचा प्रयत्न करत असे. त्यानंतर पकडण्याकरिता त्याला अटक करण्यासाठी आठ पथकं तयार करण्यात आली होती, या प्रकरणानंतर आरोपी फरार आहे होता, मात्र सामाजिक दबावामुळे आणि राज्यातील असंतोषामुळे तत्काळ कार्यवाही म्हणून डॉग स्क्वॉड आणि क्राईम ब्रांच तपासासाठी कार्यरत करण्यात आले होते त्यानंतर तब्बल 72 तासानी आरोपीला पकडण्यात पोलिसाना यश मिळाले.
५. प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांची निष्क्रियता:
- पुण्यातील गजबजलेल स्वारगेट एसटी डेपोमध्ये ज्याठिकाणी 24 तास सुरक्षा असतानासुध्दा ही घटना कशी घडली असे प्रश्नचिन्ह मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये आहे ?
- हा प्रकार घडल्यामुळे गर्दीच्या ठिकाणी देखील महिलांची सुरक्षा धोक्यात असल्याचे स्पष्ट झाले.
- असल्या प्रकारच्या सुरक्षेच्या हलगर्जीपणामुळे 23 सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आले.
६. पुणे स्वारगेटच्या प्रकरणानंतर समाजाच्या प्रतिक्रिया आणि सावधगिरीचे उपाय ?
नागरिकांनी आरोपीला पोलीसांनी पकडल्यानंतर त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
महिलांनी प्रवासात सावधगिरी बाळगावी, अपरिचितांवर सहज विश्वास ठेवू नये हे मात्र निश्चित!
यानंतर रात्रीच्या प्रवासात शक्यतो एकटीने प्रवास करू नये, सुरक्षिततेच्या उपाययोजना घ्याव्यात.
७. सरकार आणि पोलिसांकडून अपेक्षित कारवाई
- महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर नियम लागू करावेत.
- सार्वजनिक वाहतूक स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करावी.
- आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा द्यावी.
८. निष्कर्ष:
ही घटना महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करते ?
समाजातील अशा गुन्हेगारांविरोधात कठोर पावले उचलली पाहिजेत !
प्रशासनाने आणि नागरिकांनी मिळून महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे !
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….
YouTube | Subscribe Now |
फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
टेलिग्राम | जॉईन करा |
Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.