26 January Republic Day Marathi Speech for Students
Republic Day Special प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व व Dr. Babasaheb Ambedkar महत्त्व
26 जानेवारी Republic दिनानिमित्त खास मराठी भाषण. भारतीय संविधान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि लोकशाहीचे महत्त्व सविस्तर वाचा.
Republic Day – भारतीय लोकशाहीचा अभिमान
आदरणीय अध्यक्ष महोदय, उपस्थित मान्यवर प्रमुख पाहुणे, सर्व शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय देशबांधवांनो, सर्वांना 26 जानेवारी Republic Day (प्रजासत्ताक दिनाच्या) खुप खुप शुभेच्छा!
मित्रहो आजचा दिवस म्हणजे भारतीय संविधान लागू झाल्याचा ऐतिहासिक दिवस असून आपल्या करीता गौरवाचा दिवस आहे. आजच्याच दिवशी 26 जानेवारी 1950 रोजी आपला भारत देश संपूर्ण प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून जगासमोर उभा राहिला. या दिवशी आपण आपल्या देशाच्या लोकशाही मूल्यांचा, स्वातंत्र्याचा आणि समतेचा गौरव करतो हे आपल्याला माहित असायला हवे.
Republic Day निमित्ताने भारतीय संविधानाचे महत्त्व
आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित स्वरूपातील संविधान आहे. या संविधानामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला – स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय, हे मूलभूत अधिकार मिळालेले आहेत. आणि या महान अश्या संविधानाचे शिल्पकार म्हणून आपण बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान आपण कधीही विसरू शकत नाही. त्यांनी त्यांच्या बुध्दी सामर्थ्याच्या जोरावर त्यांच्या अथक परिश्रमातुन तयार केलेले संविधान आजही आपल्या भारताची दिशा ठरवत आहे.

Republic Day निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार
मित्रों डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात
- “संविधान कितीही चांगले असले तरी ते राबवणारे लोक चांगले नसतील तर ते निष्फळ ठरते.”
- “जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज आपला इतिहास घडऊ शकत नाही.”
- “शिक्षण हे सर्व क्षेत्राची गुरुकिल्ली आहे.”
- “शिक्षणा अभावी व्यक्ति हां गुलाम बनतो.”
म्हणूनच प्रत्येक देशातील प्रत्येक नागरिकाने संविधानाचा आदर, अभ्यास आणि अंमलबजावणी करणे ही आजच्या काळाची सर्वात महत्वाची गरज आहे.
आजच्या काळातील प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व
आज आपण पाहतो की आपला भारत देश हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारत, शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा या क्षेत्रांत भारत झपाट्याने प्रगती करत असल्याचे दिसत आहे. पण याबरोबर आज आपल्यावर अनेक जबाबदारी आहेत जसेकी,
आपण संविधानिक मूल्ये जपून त्याचा आदर करावा. आपण सर्वानी जात, धर्म, भाषा यापलीकडे जाऊन आपल्यामध्ये एकता राखावी तसेच एकात्मतेचा सन्देश दिला पाहिजे. आपण देशासाठी प्रामाणिकपणे कार्य करू असा आत्मविश्वास स्वतामध्ये तयार केला पाहिजे.
Republic Day निमित्त आपण काय संकल्प केले पाहिजे ?
या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनी आपण सर्वांनी संकल्प करूया की, आपण सर्व संविधानाचे, संविधानिक मुल्यांचे पालन करू तसेच देशाची एकता व अखंडता राखू त्यासोबतच एक सजग, जबाबदार नागरिक बनू असा निर्धार करू.
निष्कर्ष
प्रजासत्ताक दिन हा केवळ उत्सव नसून, तो जबाबदारीची जाणीव करून देणारा दिवस आहे. चला तर मग, सर्व संकल्प पूर्ण करण्या करीता सर्वानी प्रयत्न करू.
“जय हिंद, जय भारत जय संविधान !” या घोषणेसह आपले भाषण संपवतो.
धन्यवाद!
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.
