भाग घ्या संविधान दिवस क्विज मध्ये आणि जिंका तब्बल 7.25 लाखांची बक्षीसे
संविधान दिवस क्विज प्रतियोगिता
यावर्षी भारतीय संविधान स्वीकार करून 75 वर्षे पूर्ण होत आहे हा भारतासाठी एक आनंदाचा आणि गौरवाचा क्षण आहे या निमित्ताने या प्रतियोगेचे आयोजन करण्यात आलेले आहे या प्रतियोगितेमध्ये भाग घेण्यासाठी भारत सरकारने 26 नोव्हेंबर 2024 ते 15 डिसेंबर 2024 पर्यंतचा कालावधी दिलेला आहे यामध्ये भारतातील तरुणांना आणि नागरिकांना संविधानाची निर्मिती कशाप्रकारे झाली त्याचे मुख्य उद्दिष्ट काय संविधान निर्माण करण्यामध्ये कोणाची भूमिका आहे बाबासाहेबांची यामध्ये काय योगदान आहे शिक्षण हे कुठल्या क्षेत्रामध्ये असायला पाहिजे आणि त्याचा अर्थ काय भारताच्या संविधानाचे कामगिरी कशाप्रकारे आहे आपल्याला संविधानाने कुठल्या प्रकारचे अधिकार दिलेले आहेत तसेच राज्यघटनेच्या निर्माण करण्यापासून तर आजपर्यंत ते राज्यघटना किती महत्त्वाची आहे हे या प्रतियोगितेचे शीर्षक आहे यामध्ये भारतातील 12 प्रादेशिक भाषांमध्ये हे प्रतियोगिता आपल्याला देता येणार आहे त्यामध्ये मराठी हिंदी इंग्रजी या भाषां व्यतिरिक्त आणखीन भाषा उपलब्ध आहेत ज्यामध्ये आपण हे प्रतियोगिता देऊ शकतो.
संविधान दिवस क्विज प्रतियोगितेचा उद्देश्य
भारतीय संविधान म्हणजेच राज्यघटना स्वीकार केल्याच्या घटनेला नुकतेच 75 वर्ष होत आहेत आणि दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिवस म्हणून पाळतो यावर्षी या घटनेला 75 वर्षे पूर्ण झाले असल्याकारणाने भारत सरकार द्वारा संविधान दिवस क्वीज 2024 चे आयोजन करण्यात आलेले आहे या संविधानामुळे भारतातील नागरिकांना समता स्वातंत्र बंधुता आणि न्याय हे तत्व बहाल करण्यात आले लोकांना आपल्या हक्क आणि अधिकार याबद्दल माहिती मिळाली मानस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला त्या संविधानात प्रति आपले काही उत्तरदायित्व असायला पाहिजे या उद्देशाने भारत सरकार द्वारा या क्वीजचे प्रतियोगिता चे आयोजन करण्यात आलेले आहे.
या प्रतियोगिता मध्ये भारतातील नागरिक तरुण-तरुणी सामील होऊ शकतात त्यामध्ये काही महत्त्वाचे नियम सुद्धा दिलेले आहेत लोकशाहीच्या चौकटीला आकार देण्याच्या भूमिकेच्या माध्यमातून दूरदर्शन नेत्यांना म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना योग्य सन्मान देण्यासाठी या प्रतियोगिता चे आयोजन करण्यात आलेले आहे भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला भारताचे संविधान लिहून एक महारसी भेट दिलेली आहे हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे त्यामुळे बाबासाहेबांचा गौरव होणे महत्त्वाचे आहे या उद्देशाने भारत सरकारने या प्रतियोगिता विषय आयोजन केलेले आह.
भारतीय संविधान प्रतियोगिता 2024 ची प्राईज

- भारतीय संविधान प्रतियोगितेमध्ये विजयी होणाऱ्या विजेत्यास किंवा सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यास 1,00,000/- पारितोषिक देण्यात येणार आहे
- दुसऱ्या क्रमांकावर सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस 75,000/- देण्यात येणार आहे
- तिसऱ्या क्रमांकावर कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस किंवा तरुणास तरुणीस 50,000/- पारितोषिक मिळणार आहे
- त्याचप्रमाणे जे या प्रतियोगितेमध्ये सहभागी होतील अशा 200 सहभागींना प्रत्येकी 2,000/- प्रति रोख बक्षीस दिले जाणार आहे
- तसेच पुढील शंभर स्पर्धकांना प्रत्येकी 1,000/- रुपयांचा मानधन बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.
संविधान दिवस क्विज प्रतियोगितेमध्ये भाग घेण्यासाठी काही नियम

हे स्पर्धा भारतातील नागरिकांसाठी असून भारतीय वंशाच्या व्यक्तीसाठी खुली आहे .
हे स्पर्धा भारतातील बारा भाषांमध्ये म्हणजेच मराठी इंग्रजी हिंदी असं मी बंगाली गुजराती कन्नड मल्याळम ओडिया पंजाबी तामिळ आणि तेलुगु अशा बारा भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
हे प्रतियोगिता ऑनलाइन स्वरूपाची आहे त्यामुळे यामध्ये ऑनलाईन प्रकारे आपण सहभाग घेऊ शकतो .
स्पर्धकांना फक्त एकदाच यामध्ये भाग घेण्याची परवानगी आहे.
ही स्पर्धा सुरू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचे रिफ्रेश करणे टाळावे .
या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्केटिंग नाही म्हणजेच तुमचे मार्क वजा केले जाणार नाहीत .
या प्रतियोगितेमध्ये 10 प्रश्न आहेत ज्याचे उत्तर तुम्हाला 300 सेकंदामध्ये देणे आवश्यक आहे .
जो जो प्रतिभागी यामध्ये सम्मिलित होणार आहे त्याला योग्य उत्तर देणे त्याचप्रमाणे सर्वात कमी वेळ लागणाऱ्या व्यक्तीस विजेता म्हणून घोषित केले जाणार आहे .
हे स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर सहभागीय आणि त्यांचे सहभाग तसेच पूर्णत्व ओळखून डिजिटल सहभाग प्रमाणपत्र सुद्धा भारत सरकार तर्फे डाउनलोड करू शकतो .
या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्या नंतर पृष्ठ रिफ्रेश करू नये आणि त्यांचे प्रवेशिका नोंदणी करण्यासाठी पृष्ठ सबमिट करावे.
कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन किंवा गैरप्रकार आढळल्यास आयोगांना अपात्र ठरवण्यात येईल .
प्रतियोगितेमध्ये भाग घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचे खोटी माहिती आढळून आल्यास त्याला वजा करण्यात येईल .
हे प्रतियोगाचा भारतातील तरुणांसाठी भारतीय संविधानाबद्दल जागृती व्हावी या उद्देशाने भारत सरकारने आयोजित केलेली आहे त्यामुळे प्रत्येक तरुणाने यामध्ये भाग घ्यावा आणि लाखोंचं बक्षीस जिंकावे संविधानाचा आदर करावा संविधानाचे मूल्य जपावे हा भारत सरकारचा एक प्रामाणिक हेतू आहे.
त्या सुवर्णसंधीचा आपण लाभ घ्यावा आणि सहभागी व्हावे सहभाग होण्यासाठी या ठिकाणी आपण क्लिक करावे.
याव्यतिरिक्त आणखी नियम पडताळणी करिता येथे पहावे.
|
YouTube |
Subscribe Now |
|
फेसबुक ग्रुप |
|
| व्हाट्सएप ग्रुप |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.
यासारख्या आंनखी मनोरंजक ताज्या बातम्या साठी येथे भेट द्या
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….

4 Comments