संतोष देशमुख हत्या प्रकरण; प्रकाश आंबेडकरांच मोठं विधान, देशमुख कुटुंबाशी चर्चा
देशमुख कुटूम्बानी घेतली वंचित प्रमुख बाळासाहेब/ प्रकाश अम्बेडकर यांची भेट!
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता नवीन वळण! देशमुख कुटुंबाने वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्यानंतर त्यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. जाणून घ्या त्यांचे मत आणि प्रकरणातील पुढील घडामोडी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता एक नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणावर प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या तार्कीक विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. देशमुख कुटुंबाने नुकतीच प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली, ज्यामध्ये त्यांनी न्यायाची मागणी केलेली आहे; प्रकाश अम्बेडकरानी त्याना आपण त्यांच्या पाठीशी आहोत असे अस्वासन दिले.
संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि राज्याचे राजकारण
संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे सम्पुर्ण महाराष्ट्राचे राजकारण तापले असताना देशमुख कुटूम्बाने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब उर्फ प्रकाश अम्बेडकर यांची भेट घेतल्याने सम्पुर्ण राज्याचे लक्ष पुन्हा या प्रकरणाकडे लागलेले आहे, प्रकाश अम्बेडकरानसोबत बंद दाराआड यशवंत भवन अकोला येथे देशमुख कुटूम्बाची अर्धातास चर्चा झाल्याचे कळतय.
प्रकाश अम्बेडकरांचे संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठे विधान!
सर्वप्रथम बाळासाहेब अम्बेडकरानी या हत्येचा निषेध नोंदविला त्यासोबतच त्यानी असे म्हटले आहे कि, हि हत्या अत्यंत क्रुर पध्दतीने करण्यात आलेली आहे व ज्याप्रमाणे इंग्रजीमध्ये आपण ऑनर किलिंग म्हनतो त्याचप्रामाने असे म्हटले पाहिजे की जातीसाठी किवा जातीच्या प्रतिष्ठेसाठी हत्या केल्या गेली असावी असे मोठे आणि महत्वाचे विधान प्रकाश अम्बेडकरानी केलेले आहे.
याप्रकरनी प्रकाश अम्बेडकरानी स्वत: लक्ष देत जिल्ह्याचे एस पी यांची भेट घेत याप्रकरनी चौकशीची माहिती घेतली सोबतच पोलिसाना आणि प्रशासनाला काही महत्वाच्या सुचनादेखील केल्यात. चौकशीदरम्यान आता केवळ पॅथोलॉजिकल फॉरेंसिक माहिती गोळा करने महत्वाचे नाही तर त्यासोबतच क्लिनिकल फॉरेंन्सिक करणेसुध्दा महत्वाचे आहे असे सुध्दा महत्वाचे विधान प्रकाश अम्बेडक यानी केले.
व्यक्तिची ज्यावेळेस हत्या झाली त्यावेळेस त्याला लागन्यात आलेला मार सोबतच त्याच्या शरिरावरील निशान या सर्व गोष्टीचा विचार करुन त्यानी असे म्हटले आहे या केवल क्लिनिकल फॉरेंन्सिक मधुन तपासले जाऊ शकते आणि ते तत्काळ सरकारने याकडे लक्ष द्यावे असा आग्रह त्यानी सरकारकडे केलेला आहे.
उत्तर भारतामध्ये ज्या पध्दती आहेत किवा हरियाणा मध्ये ज्या ऑनर किलिंग चे प्रकरन घडतात ते आता महाराष्ट्रामध्ये घडत आहेत हि सर्व राज्यासाठी आणि दुर्दवाची गोष्ट आहे असे त्यानी म्हटले याचा सर्व राजकीय पक्षानी निषेध करवा ही अपेक्षा त्यानी वंचित बहुजन आघाडीच्या वतिने त्यानी व्यक्त केली.
मागील काही महिन्यांमध्ये राज्याममध्ये मराठा आरक्षन व ओबीसी आरक्षन प्रकरन जास्त प्रमानमध्ये गाजलेले आहे, हि हत्या त्याच्याशीतर निगडीत नाहिना असा सवाल त्यानी उपस्थित केला. राज्याने जे आरक्षन मराठा समाजाला दिले आहे ते घटनात्मक आहेका ? संविधानाच्या चौकटीमध्ये ते बसतय का हे तपासने देखील गरजेचे आहे तेव्हाच त्या आरक्षनाचे महत्व आहे अन्यथा नाही.
राज्यामध्ये वेगवेगळे हत्याकांड होणे, आरक्षनाच्या मुद्यावरुन समाजा-समाजामध्ये निर्माण झालेले तेढ त्वरित थाबवावेत अन्यथा हे खुप दुर्दवी आहे त्याकडे शासनाने लक्ष देऊन काही उपाययोजना आखने गरजेचे आहे, नाहितर हे तेढ कुनालाही थाबविता येनार नाहित हि एक विनंती त्यानी राज्याच्या आमदार खासदाराला यांनादेखील केलेली अहे असे ते यावेळेस म्हनाले.
चर्चेनंतर देशमुख कुटूम्बाचे विधान
प्रकाश आंबेडकरांनी देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी आपन त्यांच्या पाठीशी असेल असं आश्वासन दिलंय असे देशमुख कुटूम्बिय म्हनाले सोबतच आदरणीय साहेबांसोबत आमची एक अर्धा तास चर्चा झाली. आम्ही त्यांच्याकडुन या घटनेतून पुढे कसं जायचं न्यायालयीन कामकाजाचं विषयी मार्गदर्शन घेतलं. देशमुख कुटुंबाने न्यायाच्या लढ्यासाठी सरकारकडून तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे याप्रसंगी केलेली आहे. त्यांनी म्हटलं, “आम्हाला आशा आहे की प्रकाश आंबेडकर यांच्या पाठिंब्यामुळे या प्रकरणात योग्य तो न्याय मिळेल.” वेळेप्रसंगी आम्ही निश्चितच प्रकाश अम्बेडकर साहेबांचे मार्गदर्शन घेऊ असे देशमुख कुटूम्बिय म्हनाले.
बीडीच्या हत्या प्रकरणी अकोला येथे जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता त्यामध्ये संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्याची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली आरोपींना कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा निघालेला होता सोबतच या दुखातून आम्ही लवकर सावरु शकत नाही या दुखामध्ये आम्ही आमचे गावे गेले 40 दिवसानपासुन संगर्ष करित आहोत व अरोपी अद्यापही फरारच आहेत असे मत देशमुख कुटूबाने केलेले आहे. लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावे असे मत त्यानी या माध्यमातुन सरकारसमोर मांडलेली आहेत.
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.
