नाशिक पासून अवघ्या एका तासाच्या अंतरावर स्वर्गाचा देखावा ! आपण पाहिला आहेका ?

Saputara Hills Station Near By Nashik

सह्याद्री पर्वत रांगेमध्ये वसलेले देशातील अतिशन सुंदर असे ठिकान महाराष्ट्र व गुजरात राज्याला जोडुन आहे व गुजरात राज्यातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे जे गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यामध्ये वसलेले आहे. आपण येथे गेलात तर आपल्याला एक स्वर्गाचा देखावा पहायला मिळेल.

सापुतारा हिल स्टेशन/ थंड हवेचे ठिकाण

भारत हा परंपरा आणि विविधतेने नटलेला देश आहे, येथे अनेक लोक ज्याप्रमाने देवावर श्रद्धा ठेवतात त्याचप्रमाणे काही लोक निसर्गावरही प्रेम करतात निसर्गातील झाडं प्राणी यांना ते देव मानतात. यापैकी अनेक ठिकाणी प्राण्यांची पूजाही करण्यात येते आज आपण जाणून घेऊयात अशा एक ठिकाणाबाबत जे आपल्या सौंदर्यासोबत येथील परंपरासाठीही ओळखले जाते भारतातील अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणांवर फिरायला जाण्याची आधीपासूनच सवय/आवड आहे आणि त्यासोबतच अनेकदा फिरण्यासाठी हिल स्टेशनला ही प्राधान्य देण्यात येते मनाली, मुन्नार, शिमला याव्यतिरिक्तही अनेक हिल स्टेशन आहे जे आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जातात आणि यापैकीच एक म्हणजे सापुतारा हिल स्टेशन ! सापुतारा हिल स्टेशन हे नाशिक पासून 80 ते 90 आणि मुंबई पासून 250 km अंतरावरती आहे, सापुताऱ्यातच एक मोठे बस स्थानक सुद्धा आहे त्यामुळे सुरतला जाणाऱ्या कुठल्याही बस मार्फत तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता. या ट्रिपला जाताना तुम्ही वनीगडावर स्थित असलेल्या आई सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी तसेच पुढे असलेल्या ऐतिहासिक हदगड किल्ल्यावरही जाऊ शकता येथे जाताना तुम्हाला एकही टोलनाका लागणार नाही मात्र महाराष्ट्र गुजरात बाउंड्रीवर असलेल्या चेक पोस्ट वर तुमची

कार तसेच कार मधील संपूर्ण वस्तूंची चेकिंग मात्र नक्की होणार.  हे लक्षात असू द्या आणि जसे तुम्ही सापुतारामध्ये एंट्री कराल तेव्हा तुम्हाला 50 रुपयांची एंट्री पावती करावी लागणार.

या ठिकाणी बरेच रिसॉर्ट होमस्टे हॉटेल्स फार्महाऊस, विलाज आणि डोरमेट्री सारख्या सोयी सुद्धा उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही इथे जास्त वेळ थांबून इथल्या निसर्गरम्य वातावरणात वेळ घालवू शकता.

सापुतारा सनसेट/सन राइज पॉईंट

निसर्गाने नटलेल्या एक अतुलनीय ठिकाण म्हणजे सापुतारा, या ठिकाणी सनसेट पॉइंट जिओ चाहत्यांचा आकर्षक पॉइंट आहे ज्या व्यक्ती निसर्गावर प्रेम करतात त्यांच्यासाठी हा एक अतुलनिय आठवणीचा साठा आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर व्यक्ती कुठलाही ताण तणावामध्ये जरी असली तरी निसर्गातील हे एक अलौकिक सौंदर्य पाहून तो सर्व विसरून जातो आणि एक लव स्वर्गात गेल्या चित्र भासते.

सापुतारा बोटिंग पॉईंट

अगदी फेमस पॉईंट वरती आलेलो आहोत इथे आहे सापुताऱ्याचा लेक आणि तिथे बोटिंग चालते इथे खूप प्रकारच्या बोटी आहे. सापुतारा मध्ये एंट्री केल्यानंतर सर्वप्रथम आप्ल्याला तेथे बोटिंग पॉईंट चा आनंद घेता येतो खुप छान असे सर्पगंगा सरोवर आहे त्याठिकाणी अनेक बोट आपल्याला पहायला मिळतिल तसेच आकर्षक देखावा देखिल पाहायला मिळेल. सध्या हिवाळा लागलेला आहे आणि हिवाळ्यामध्ये इथे बरेच टुरिस्ट व्हिजिट करतात आणि अतिशय टॉप ठिकाण आहे आपण म्हणू शकतो आणि फॅमिली साठी खूप मस्त प्लेस आहे.

पुढे टेबल पॉईंटवर तसेच बोटिंग पॉईंटवर जाताना हे दोन छान सर्कल तुमच्या स्वागतासाठी तयारच असतात.

oppo_1026

सापुतारा पॅराग़्लाइडिंग पॉईंट

सापुताऱ्याच्या पॅराग्लायडिंग पॉईंट इथे पॅराग्लायडिंग चालते, तसेच हा एरिया इथूनच चालते पॅराग्लायडिंग पॉइंट समोरच एक वेटिंग रूम आहे आणि इथे तिकीट काउंटर आहे, तर ₹2500 प्रति व्यक्ती इथे पॅराग्लाइडिंगचे चार्जेस आहेत. आणि जर तुम्हाला कॅमेराची फुटेज हवी असेल गोप्रो मध्ये तर त्याचे तीन हजार रुपये चार्जेस आहे तर अशाप्रकारे तुम्ही इथे पॅराग्लायडिंग करू शकता.

सापुतारा रोपवे पॉईंट

इथे एंट्री तिकीट आहे 77 रुपीज प्रति व्यक्ती आणि टाइमिंग आहे सकाळी नऊ ते बारा आणि पुन्हा दुपारी दोन ते पाच.

तर मित्रांनो सापुताराच्या या टॉप हिल पॉईंट वरती तुम्ही बरेच ऍक्टिव्हिटी करू शकतात कॅमल राईड आहे हॉर्स राईड आहे तसेच डर्ट बाईक राईड आहे सायकलिंग राईड आहे आणि कुठलीही राईड घ्या शंभर रुपये चार्जेस आहे.

तुम्ही फॅमिली सोबत इथे याल आणि आणि खूप एन्जॉय करायाला मिळेल असे अतिशय सुंदर असं हिल स्टेशन आहे आणि आता इथला सीजन आहे म्हणजे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी इथे खूप गर्दी असते आणि महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही राज्याकरिता हे एक मधलं हिल स्टेशन आहे म्हणजे एक मिडल पॉईंट आहे.

YouTube Subscribe Now
फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप 
व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप 
टेलिग्राम जॉईन करा
Share Chat जॉईन करा

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *