सारंगखेडा Chetak Festival यात्रेत व्हाईट कोब्रा, रुद्राणी व मोरणीचं भव्य आगमन

सारंगखेडा Chetak Festival यात्रेत ‘व्हाईट कोब्रा’चा दमदार प्रवेश; तब्बल कोटींची ‘रुद्राणी’ आणि ६० इंची ‘मोरणी’ ठरल्या आकर्षणाचा केंद्रबिंदू

राज्यातील नंदुरबारच्या सारंगखेडा अश्व यात्रेत Chetak Festival यंदा घोड्यांची जबरदस्त फौज दाखल झाली आहे ज्यामध्ये ‘व्हाईट कोब्रा’ अश्वाच्या आगमनाने स्पर्धेला रंग चढला आहे. देशभरातील १५ स्पर्धा जिंकलेल्या या पांढराशुभ्र घोड्याने सम्पूर्ण यात्रेचे लक्ष वेधून घेतले आहे त्यामुळ हां घोडा या यात्रेच लक्ष वेधून घेत आहे.

या यात्रेत देशभरातून घोड्यांचा रेटा वाढला असून, तब्बल 175 घोड्यांची विक्री व – उलाढाल ही 85 लाखां पेक्षा जास्त झाल्याचे समजले जात आहे.

नंदुरबार जिल्ह्यात प्रसिद्ध असलेला सारंगखेडा घोडेबाजारात अवघ्या चार दिवसांत तब्बल 175 नदी घोड्यांची विक्री झाली आहे आणि हा या वर्षीचा विक्रम मानला जात आहे कारण यात्रा सुरु व्हायला अजुन वेळ असताना सुरुवातीलाच अश्या प्रकाराकराचा प्रतिसाद मिलने त्यामुळ या यात्रेवर सर्व अश्वप्रेमिंचे लक्ष वेधले आहे.

यात्रा सुरु होण्या आधीच बाजारातील एकूण उलाढाल कोटीपर्यंत पोहोचली आहे. आगामी चेतक फेस्टिवलमुळे उंच, महागडे आणि प्रीमियम ब्लड लाईनचे घोडे मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत.

सारंगखेडा Chetak Festival 2025 

व्हाईट कोब्रा – 68 इंची हाइट, तुफान ब्लडलाइन, प्रीमियम ग्रूमिंग

68 इंच उंचीचा, तुफान ब्लडलाईनचा ‘व्हाईट कोब्रा’ यात्रेचे विशेष आकर्षण बनला आहे.

हा घोडा तुफान ब्लडलाईन, आलीशान, बरखाना अशा प्रजातींच्या सर्वोत्तम गुणधर्मांचे मिश्रण असलेला आहे. त्यामुळ जत्रेची ‘सेलिब्रिटी’ – मध्यप्रदेशची 1 कोटी 17 लाखांची ‘रुद्राणी’ ठरली आहे, जी २२ महिन्यांची पण तब्बल ६५+ इंच उंची असलेली मध्यप्रदेशातून आलेली ‘रुद्राणी’ यात्रेचा स्टार आकर्षण ठरत आहे.

Chetak Festival सर्वाधिक महाग ठरलेली ‘रुद्राणी’ ची विशेष वैशिष्ट्ये :

वय : 22 महिने

उंची : 65+ इंच

किंमत : ₹1 कोटी 17 लाख (पुष्कर बाजारात ठरलेली)

डाएट : दररोज 8 लिटर गाईचे दूध

प्रीमियम केअर, मसाज, स्पेशल ग्रूमिंग

रुद्राणीच्या बांधणी आणि दमदार चालीनं जाणकारही थक्क झाले आहेत.

उत्तर प्रदेशातील ‘मोरणी’ – ६० इंची उंचीची सुंदरता यात्रेत चमकतेय तसेच रुद्राणीसोबतच यूपीची ६० इंच उंचीची ‘मोरणी’ही यात्रेच्या ग्लॅमरमध्ये भर घालत आहे त्यामुले हा उस्तव सर्वांचा आकर्षण ठरत आहे. या घोड्याची मोठी उंची, रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि देखणा चाल यामुळे मोरणी आसपासच्या सर्व गर्दीचं लक्ष वेधतेय.

घोड्यांची स्पेशल केअर – गाईचं दूध, प्रीमियम आहार आणि फिल्टर पाणी (याचे अश्व शौकिन राजेंद्र यादव यांनी घोड्यांच्या केअरबद्दल सांगितले ते म्हणतात घोड्याला देण्यात येणारे फिल्टर पाणी – पाणी जितकं स्वच्छ तितका घोडा स्वस्थ त्याला खायला देण्यात येणारे चना भुसा, गहू भुसा, तांदुळ भुसा ही विशेष.

गाईचं दूध : लहान घोड्यांना 2–4 लिटर, मोठ्यांना 10 लिटर सोबतच सकाळ-संध्याकाळ मालिश आणि स्वच्छता आणि या घोड्यांच्या देखरेखी करीता खास केअरटेकर घोड्यांसोबत ठेवण्यात आले आहेत. या सर्वांच्या मेहनतीमुळेच हे महागडे, उंच जातीचे घोडे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी तयार होतात.

Screenshot

सारंगखेडा Chetak Festival सुरुवात कधी होत आहे ?

या वर्षी 9 डिसेंबरपासून सुरू – चेतक फेस्टिवलच्या स्पर्धा

सारंगखेडा Chetak Festival मध्ये आकर्षक स्पर्धा ?

यावर्षीच्या आकर्षक स्पर्धांमध्ये —

अश्व सौंदर्य स्पर्धा

अश्व वृत्त (Gait) स्पर्धा

रेस

आयोजित ठिकानावरिल अनेकांच्या मतानुसार पुढील काही दिवसांत अधिक महागडे आणि दुर्मिळ जातींचे घोडे सारंगखेडा यात्रेत दाखल होणार आहेत.

सारंगखेडा Chetak Festival यात्रेत दुहेरी आकर्षण : देशभरातून आलेले रॉयल अश्वप्रेमी

या वर्षीच्या व्हाईट कोब्रा, कोटींची रुद्राणी आणि उंचीची मोरणी यांच्या आगमनानं यात्रेचं ग्लॅमर दुपटीने वाढलं आहे. अश्वप्रेमींसाठी यंदाचा चेतक फेस्टिवल हा एक सुपर-ग्रँड अनुभव ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….

YouTube Subscribe Now
फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप 
व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप 
टेलिग्राम जॉईन करा
Share Chat जॉईन करा
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *