तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज शिरीष मोरेनी का उचलले टोकाचे पाऊल ! आत्महत्तेचे कारणे आलेत समोर !
संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज शिरीष मोरेनी यांच्या आत्महत्येमागची कारणं शोधताना अनेक गंभीर मुद्दे उघडकीस आले. वाचा संपूर्ण माहिती!
संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज शिरीष मोरेनी यांनी आत्महत्या केल्याची बातमी सर्वांना धक्का देणारी आहे. त्यांच्या मृत्यूमागची कारणं शोधताना अनेक गंभीर मुद्दे समोर आले आहेत. शिरीष मोरेनी यांच्या आयुष्यातील अडचणी, मानसिक आरोग्य आणि कुटुंबातील परिस्थिती यावर प्रकाश टाकणारा हा लेख आहे.
शिरिष मोरेंनी केली आत्महत्या ! वारकरी सम्प्रदाय शोकाकुळ
महाराष्ट्राचे थोर संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज शिरीश महाराज मोरे यांनी गळफास घेतल्याची घाटना नुकतीच घडलेली आहे. या घटनेनं देहू मध्ये एकच खळबळ उडाली ही घटना 5 फेब्रुवारीला सकाळी 08:30 वाजताच्या सुमारास समोर आली. ही घटना समोर येताच वारकरी संप्रदायासह संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये खळबळ उडाली आहे. आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या केल्याचं शिरीश मोरे यानी लिहिलेल्या सुसाईड नोट मधून समोर आले आहे. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी शिरीश महाराजांनी तब्बल चार चिठ्ठ्या लिहून ठेवलेल्या आहेत. महाराजांचा नुकताच साखरपुडा देखील झाला होता एप्रिल किंवा मे महिन्यात त्यांचा विवाह सोहळा होणार असल्याचे समजले जात होते.
आत्महत्तेपुर्वी त्यांनी चार चिठ्ठ्या लिहिल्या, ज्यामध्ये भावना व्यक्त केल्या
शिरीष मोरे यांची पहिली चिठ्ठी :-
आत्महत्या करण्यापूर्वी तब्बल 4 चिठ्ठ्या लिहिल्या आहेत, शिरीश मोरे यांनी पहिली चिठ्ठी आपल्या आई-वडिलांना व बहिणीला लिहिली आहे या चिठ्ठीमध्ये ते असे म्हणतात काय लिहू काही समजत नाही वयाच्या 30व्या वर्षापर्यत आयुष्यात जे जे करायचं म्हटलं त्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही पाठीशी उभे राहिले. लोकांना जे जे मिळवण्यासाठी कितीतरी वर्षे लागतात ते तुमच्या पाठिंब्यामुळे मला काही वर्षातच मिळवता आल व इथवर पोहोचलो ते तुमच्यामुळेच. आयुष्यात कधीच तुम्हाला माझ्यामुळे खाली मान घालावी लागली नाही एवढं सुंदर आयुष्य जगलो मला तुम्ही जन्म दिलात एवढं घडवलंत सोबतच माझ्या पाठीशी उभे राहिलात पण नेमकं मीच तुमच्यासाठी उभं राहायला पाहिजे होते तेव्हा तुमचा हात सोडून जातोय… कधी कधी सर्व मिळून सुद्धा माणूस युद्ध हारतो मीही थांबत आहे याचा दोष सर्वस्वी माझाच आहे मला माफ करा तुम्हाला एकट टाकून चाललोय तुमचा शिरीश मोरे… ही भावनिक चिठ्ठी त्यांनी आपल्या आई-वडिलांनी लिहिलेली आहे. ज्यामध्ये त्यानी आत्महत्तेला स्वत:ला दोष दिलेला आहे.
शिरीष मोरे यांची दुसरी चिठ्ठी:-
दुसरी चिठ्ठी लिहिली आहे ती त्यांच्या मित्रांच्या नावानं त्यामध्ये त्यांनी त्यांच्यावर असलेल्या कर्जाचा उल्लेख केलेला आहे या चिठ्ठीत ते असं म्हणतात प्रिय आकाश, मनीष, अक्षय, अजय आणि सर्वच मित्रांनो खरं तर युद्ध सोडून पळून जाणाऱ्या कुठल्याही माणसाने मदत मागणे हे चूकच परंतू कृपा करून माझ्या आई-वडिलांना सांभाळा माझ्या दीदीचं चांगलं स्थळ पाहून तीचे लग्न लावून द्या आणि माझ्यावर जो खूप मोठा कर्जाचा डोंगर डोक्यावर आहे तेवढा आई-वडिलांच्या डोक्यावरून उतरवा. कोणाचे किती हे वडिलांना माहीतच आहे असं म्हणून त्यांनी पुढे त्यांच्यावर असलेल्या कर्जाचे आकडे दिलेत यामध्ये त्यांच्यावर तब्बल 32 लाख 35 हजारांचं कर्ज असल्याचे दिवस आहे. गाडीचे कर्ज आहे ती विकून नील होईल! आणि 25 लाख राहतात त्यामध्ये तुम्ही सर्वांनी थोडी थोडी मदत करून आई-वडिलांना जपा अशी भावनिक साद देत पुढे या चिठ्ठीत ते म्हणतात मला माफ करा आणि हो आमची नवरी बाई तिची सगळी स्वप्न मी उद्ध्वस्त करून चाललोय खूप गोड आहे प्रियंका ! तिला कधी मला वेळच देता नाही आला तिच्यासाठी तुम्ही चांगला मुलगा पहा ती नाही करणार लग्न हात जोडून माफी मागतो तुमचाच शिर्या… असा उल्लेख त्यानी मित्राना लिहीलेल्या चिठ्ठीमध्ये केलेला आहे.
शिरीष मोरे यांची तिसरी चिठ्ठी :-
एक चिठ्ठी त्यांनी लिहिली ज्यामध्ये त्यानी असे म्हटले आहे कि खूप कष्ट करा आपली इकोसिस्टीम उभी करा मला माफ करा थांबू नका लढत राहा विजय आपला नक्कीच आहे स्वतःला जपा अधून मधून आई-वडिलांना लक्ष द्या आयुष्याची इति कर्तव्य संपली समजून पूर्णविराम देत आहे. या चिठ्ठीमध्ये त्यानी अश्याप्रकारचा संदेश दिलेला आहे.
शिरीष मोरे यांची चौथी चिठ्ठी :-
या चिठ्ठीत त्यांनी आपल्या होणाऱ्या बायकोच्या नावाने सुद्धा काही लिहिले आहे. यामध्ये ते म्हणतात माझी लाडाची पिनू -प्रियंका खरं तर तुझा आताकुठे तुझा हात पकडला होता आणि आपले आयुष्य आता कुठे फुलायला सुरुवात झाली होती. मी जातोय तुझ्यासोबत थोडा काळ घालवायचा होता परंतू व तुला भेटून थोडा वेळ द्यावयाचा होता पण ही चूक करत आहे. मी हात जोडून माफी मागतो मला माफ कर… आयुष्यात सर्वात जास्त अपराधी मी कोणाचा असेल तर तुझा तुला न्याय नाही देऊ शकलो याची मला खंत आहे. माझ्या वाईट काळात तू माझ्यासोबत सदैव उभी राहिलीस माझ्या प्रत्येक निर्णयात साथ दिलीस, मी हात सोडला तरी माझी वाट पाहिलीस, माझ्या संघर्षात उभी राहणाऱ्या माझ्या सखे माझ्या चांगल्या वेळेची हकदार तुच होतीस, तू माफ कर झी सगळं स्वप्न तोडून जातोय कुंभमेळा राहिला, वारी राहिली, किल्ले राहिले, भारत दर्शन राहिलं, सगळंच राहिलं मी काहीही न देता सुद्धा माझी झोळी भरभरून दान टाकलस तू खूप गोड आहेस, तू तू निस्वार्थी आहेस, खूप काही बोलता येईल पण स्वतःला जप एवढा काळ थांबलीस आता मीच नसेल थांबू नकोस पुढे जा खूप मोठी हो आणि हो खूप झाले कष्ट आता वर्क फ्रॉम होम घे खूप वेळा माझ्याकडून खूप साऱ्या चुका झाल्या मला माफ कर तुझाच अहो शिरीश मोरे… असा भावनीक सल्ला त्यानी त्यांच्या होनार्या परंतू न होऊ शकलेल्या पत्निस दिला…..
शिरीष मोरेनी यांच्या आत्महत्येमागची कारणे !
शिरीष मोरे यांच्या आत्महत्तेमागील नेमके कारण काय वरवर पाहता त्यानी लिहिलेल्या पत्रांच्या आधारे असे म्हणता येईल त्यांच्यावर असणार्या 32 लाखांच्या कर्जामुळे त्यानी त्यांचे आयुश्य समप्विले आहे मात्र यामागे आणखी काही कारणे आहेत का यामगचा तपास पोलिस यंत्रणेमार्फत सुरू आहे नेमेके सत्य काय आहे त्यानी पत्रान्मध्ये लिहीले तेच आहे का आणखी काही याचा निर्णय नंतरच सर्वांच्या समोर येईल !
शिरीष मोरे महाराजांच्या आत्महत्तेमुळे निर्मान झाले प्रश्न ? व त्यांच्या भावना !
आत्महत्या: शिरीश मोरे यांनी आर्थिक ताणामुळे आत्महत्या केली का आणखी काही कारण आहेत ?
चिठ्ठ्या: त्यांनी चार चिठ्ठ्या लिहिल्या, ज्यामध्ये भावना व्यक्त केल्या.
कर्ज: शिरीशवर 32 लाखांचे कर्ज असल्याचे समोर आले त्यामध्ये काय सत्य आहे ?
विवाह: त्यांच्या साखरपुड्याची तयारी चालू असताना हा निर्णय त्यानी का घेतला?
कुटुंब: चिठ्ठीत आई-वडिलांना दिलेल्या आश्वासनांचा उल्लेख.
मित्र: मित्रांना कर्जाची माहिती दिली आणि मदतीची विनंती केली.
प्रेम: होणाऱ्या बायकोसाठीच्या चिठ्ठीत भावनिक संदेश.
आर्थिक ताण: शिरीश मोरे यांचा निर्णय आर्थिक ताणामुळे घेतला, जो अनेक तरुणांना प्रभावित करतो.
चिठ्ठ्यांचे महत्व: त्यांच्या चिठ्ठ्या भावनात्मक संवाद साधतात, आणि ते त्यांच्या आयुष्यातील संघर्ष दर्शवतात.
कर्जाची चिंते: शिरीशच्या कर्जाचा उल्लेख केल्याने, सामाजिक समस्या व कर्तव्यांची जाणीव होते.
विवाहाच्या तयारीचा आघात: साखरपुडा ठरलेला असताना आत्महत्या एक गंभीर संकेत आहे.
कुटुंबाचे महत्त्व: चिठ्ठीत कुटुंबासाठी चिंता आणि प्रेम व्यक्त केले आहे, ज्यामुळे एकटेपणा जाणवतो.
मित्रांची भूमिका: मित्रांना मदतीसाठी आवाहन करून त्यांनी आपल्या संबंधांचे महत्व दर्शवले.
प्रेमाचे दुःख: होणाऱ्या बायकोसाठीच्या चिठ्ठीत त्याच्या प्रेमाचे दु:ख स्पष्ट झाले, जे हृदयद्रावक आहे.
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….
YouTube | Subscribe Now |
फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
टेलिग्राम | जॉईन करा |
Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.