शिवरायांच्या पराक्रमाची गाथा 19 February शिवजयंती 2026 प्रभावी मराठी भाषण
19 February शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रेरणादायी मराठी भाषण सादर कसे करावे? छत्रपती शिवरायांचे पराक्रम, स्वराज्याची संकल्पना आणि तरुणांसाठी संदेश जाणून घ्या.
जानुण घ्या 19 February शिवजयंती निमित्त विद्यार्थ्यांसाठी सुंदर मराठी भाषण
पस्थित आदरणीय प्रमुख पाहुणे, माननीय शिक्षकवृंद, आणि माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो…
आज आपण सर्वजण येथे एका महान, पराक्रमी, दूरदर्शी आणि लोकहितकारी राजाचे स्मरण करण्यासाठी एकत्र आलो आहोत याची आपल्याला जाणीव आहे. १९ फेब्रुवारी हा दिवस म्हणजे रयतेचे राजे अर्थात स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती!
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोठे झाला ?
बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. माता जिजाऊंचे संस्कार आणि त्यांचे अमूल्य मार्गदर्शन यामुळे लहान वयातच शिवबा स्वराज्याच्या स्वप्नाने प्रेरित झाले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य आणि पराक्रम गाथा
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यातील स्थानिक तसेच मोगल अन्याय, अत्याचार आणि परकीय सत्तेविरुद्ध लढा देत स्वराज्याची स्थापना केली. त्यांची युद्धनीती, गनिमी कावा आणि धैर्य यामुळे मोठमोठ्या सुलतानांनाही त्यांनी त्यांच्यापुढे नमवले. अफझलखान वध, सिंहगडाची लढाई, आग्र्याहून सुटका – हे सम्पूर्ण प्रसंग त्यांच्या शौर्याची साक्ष देतात.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातिल राज्य कारभार कसा चालत होता ?
छत्रपती शिवाजी महाराज फक्त पराक्रमी योद्धे नव्हते, तर ते एक आदर्श प्रशासकही होते असे आपल्याला त्यांच्या जीवन चरित्रातुन दिसून येत. त्यांनी त्यांच्या स्वराज्यात अष्टप्रधान मंडळ स्थापन केले, शेतकऱ्यांचे रक्षण केले, स्त्रियांचा सन्मान राखला आणि सर्व धर्मांचा आदर केला. त्यांच्या राज्यात न्याय आणि सुव्यवस्था होती.
शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांचा संदेश जो आपल्यासाठी प्रेरणादायी आहे –
- नेहमी स्वाभिमान बाळगा
- सदैव अन्यायाविरुद्ध आवाज करा
- स्वतः च्या मातृभूमीवर सदैव प्रेम करा
- मोठ्यांचा आदर बाळगा
आजच्या तरुण पिढीने जर छत्रपती शिवाजी महाराजांचे धैर्य, नेतृत्वगुण आणि राष्ट्रप्रेम आत्मसात केले तर आपला भारत अधिक शक्तिशाली बनेल.
तर चला, आपण सर्वजण शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर चालण्याची प्रतिज्ञा करूया.
जय जिजाऊ! 🚩
जय शिवराय! 🚩
धन्यवाद!
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.
