तबल्याचा जादुगार काळाच्या पळद्याआड !
उस्ताद झाकीर हुसेन तबल्याचा जादूगार भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा जगभरात प्रसिद्ध आहे, आणि यामध्ये विविध वाद्यांचे योगदान आहे. मात्र, तबल्याला भारतीय संगीतामध्ये एक वेगळे स्थान आहे. तबल्याच्या माध्यमातून रचलेल्या अद्भुत लयींनी श्रोत्यांच्या हृदयाला स्पर्श करणारे अनेक कलाकार होऊन गेले आहेत. अशा या तबल्याच्या दुनियेतील एक अतुलनीय नाव म्हणजे उस्ताद झाकीर हुसेन. तबल्याच्या तालांमधून संगीतात नवचैतन्य…
