मन घडवणारा गुरु – कवितेच्या ओळींतून B. Rangnath यांची काव्यरचना
भाकर तर लागेलच ना..? कवी B. Rangnath यांच्या कवितेतून
आजच्या शेतकरी, गरिबी, आत्महत्या, धर्म–जात आणि व्यवस्थेवरील कठोर प्रश्न उपस्थित करणारी संवेदनशील कविता. ‘भाकर तर लागेलच ना..?’ – शिक्षक तथा कवी B. Rangnath यांची सामाजिक वास्तव मांडणारी काव्यरचना.
भुकेची कविता, “भाकर तर लागेलच ना..?” कवी बी. रंगनाथ यांचा व्यवस्थेवर सवाल ?
भाकर तर लागेलच ना..?
अंधार दाट होता
मनात भीतीचा कल्लोळ होता
सावकारी पाश होता
वर्षानुवर्ष अल्प भूधारक असण्याचा शाप होता
आजारपणात परिवार कंटाळला होता
आर्थिक परिस्थितीत सुधार होत नव्हता
वेळ निराशेच्या गर्तेत घेऊन जात होता
अन् काय..?
शेतकरी पती पत्नीने गळपास घेतला होता
तर दोन जवान पोरांनी रेल्वेसमोर उडी घेऊन
देह चिरडून घेतला होता
अख्ख्या परिवाराचा असा करूण अंत झाला होता
संपूर्ण गाव हळहळत होता, जिल्हा भयभीत झाला होता
सरकारी तंत्रास अशा गोष्टींचा काय फरक पडत होता….?
वोट बँकेचा काही प्रश्न नव्हता
निवडून येण्याचा एजेंडा हल्ली पार्ट्यांचा धार्मिक होता
नावाला लोकतंत्र धर्मतंत्राने लोकांचा विवेक,
तर्क करण्याचा अधिकार हिरावून घेतला होता
हिरावून घेतला होता माणूस
जातीने अन् धर्माने एकमेकांपासून….
तिथं दुसरं काय होणार..?
रोज अशीच माणसे मरत राहतील किड्यां मुंग्यांप्रमाणे…..
धर्म आणि जातीने माणसाचे पोट भरेल का..?
पीळ पडलेल्या आतड्यांना भाकर तर लागेलच ना..?
कवी:- बी रंगनाथ, बीड. वसमत (28122025)

घोटभर पाण्यापासून ज्ञानाच्या महासागरापर्यंत भीमरायांचे ऋण
बापा
मी घोटभर पाणी मागितले
अन् तू अख्खे चवदार तळेच
खुले करून दिलेस की मला
बापा भीमराया…
अन् ज्ञानाचा महासागर
खुला करून दिलास मला
स्वच्छंद ज्ञानाच्या जलाशयात
सुळक्या मारण्यासाठी
हजारों वर्षाचे दास्य
अन् गुलामीच्या शृंखला
तोडल्यास तू अमुच्या
शिक्षण, विद्या ज्ञान, प्रज्ञा
एवढी महत्त्वाची असते का बापा..?
मग तथाकथित उच्च वर्णियांनी
अपुल्याच माता भगिनींना
का बरे शिकविले नाही..?
ज्योती सावित्रीला यासाठी
का मग जन्म घ्यावा लागे..?
आणि अख्खा उच्च वर्णीय
त्यांच्या मागे का मग
राक्षसा सारखा मागे लागे..?
अजून ही बहुजन समाजाला
हे का कळत नाही ..?
कळले तर मग का वळत नाही..?
याला कारण जात आहे की धर्म..?
मी जर तथाकथित हिंदू आहे
तर मग माझा एक प्रश्न आहे
तथाकथित उच्च वर्णियांना
जातीच्या निर्मात्यांना
मुसलमान जावई चालतो
मग मी का नाही….?
माझा का खून होतो…?
कवी:- बी रंगनाथ, बीड.
(वसमत) 06122025
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
