पुन्हा अवकाळी पावसाची सुरुवात: विदर्भात येलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्त्वाचे!
तीन दिवस राज्यात गारपिटीसह पावसाचा अंदाज या जील्हामध्ये पडू शकतो भरपूर पाऊस
गेल्या काही दिवसांपासून राज्यात वातावरण बदल दिसू लागले आहेत. दिवसा गरम अन् रात्री थंडी असे चढ उतारीचे वातावरण आहे. या वातावरणामुळे सर्व सामान्य नागरिक त्रस्त तर आहेच त्यासोबत शेतकरी राजा देखील चिंतित आहे. राज्यात थंडीचा आवाका वाढलेला आहे. नेमके रब्बी हंगामाच्या वेळी अवकाळी पाऊस पडण्याची चिन्हे दिसू लागत आहे म्हणूनच कर्ज काढून पीक काढणाऱ्या बळी राजाच्या चिंतेमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. गेल्या तीन ते चार दिवसापासून वातावरणामध्ये बदल दिसून आलेले आहेत म्हणूनच शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये गारपिटीसह पाऊस होऊ शकतो, अशी माहिती हवामान खात्याने दिलेली आहे
यंदा मान्सूनने काही सरासरी पावसाची पातळी गाठलेली नाही. रजत अनेक जिल्ह्यांमध्ये कमी प्रमाणामध्ये पाऊस पडला. पर्याप्त प्रमाणामध्ये पाऊस न झाल्यामुळे अनेक धरण देखील भरले नाही, परिणामी पाण्याची टंचाई देखील निर्माण झाली. गेल्या वर्षी देखील अशीच परिस्थिती उद्भवल्यामुळे निर्माण झालेल्या सर्व परिणामामुळे शेतकऱ्यांना उन्हाळी पिके देखील घेता आली नाहीत. आता कुठे बळीराजा रब्बी पिकाची तयारी करत असतानाच वातावरणामध्ये झालेला बदल यामुळे अवकाळी पाऊस पडेल की काय असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे.
धरण साठामध्ये असलेले पर्याप्त पाणी यामुळे शेतकरी रब्बी पिकाची तयारी करताना दिसत आहेत. काही ठिकाणी पाटाना पाणी सोडलेले आहे. जलसंधारण विभागाद्वारे शेतकऱ्यांसाठी पाण्याची सोय करण्यात आलेली असून अनेक शेतकरी गहू, हरभरा व अन्य पिकांची लागवड करताना देखील आपल्याला दिसून येत आहे परंतु पुढील तीन ते चार दिवसात वादळासह मुसळधार पाऊस व गारपीट पडण्याची शक्यता आहे, यामुळे शेतकरी तसेच बागायतदार गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. राज्यात या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने गारपीटी सोबतच अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता सांगितलेली आहे आणि म्हणूनच राज्यातील अनेक भागांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या येलो अलर्टमुळे भविष्यात काही विपरीत हानी घडू नये याकरता शासकीय पातळीवर तरतुदी देखील केलेल्या आहेत तसेच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच गारपिट पडण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी शेतामध्ये केलेल्या पेरणीवर पाणी फिरणार हे मात्र निश्चित आहे. महाराष्ट्रातील जळगाव, नागपूर, विदर्भ यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणूनच शेतकरी चिंतेत आहे.
राज्यात पुढील तीन दिवस म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार या दिवशी वातावरण ढगाळ राहील. विजांचा कडकडाट होऊन अवकाळी पाऊस होईल त्यासोबत गारपिटीचा देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पुणे, नगर, नाशिक या राज्यांमध्ये देखील धुव्वादार पाऊस पडण्याची शक्यता आहे, यामुळे द्राक्षबागांवर देखील त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता सांगण्यात आलेली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन दिवस हे शेतकरी राजासाठी अत्यंत चिंतेचे ठरणार आहेत.

राज्यात अवकाळी पावसाचा इशारा: येलो अलर्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस!
आजचे राज्यातिल हवामान
आज राज्याच्या दक्षिण भागात ढगाळ्यात वातावरण जास्त प्रमाणात पाहायला मिळण्याची शक्यता आहे, सध्या गडचिरोलीच्या काही दक्षिण देखील ताब्यात मध्ये ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलके थेंब सक्रिय आहेत आणि अशाच प्रकारे पूर्वेकडुण वारे येत राहिल्यामुळे राज्यात येत्या दोन दिवसात खास करून आज रात्री उशिरा ते पहाटेच्या आसपास सोलापूर कडे व धाराशिव सोलापूर, लातूर, नांदेड आणि चंद्रपूर गडचिरोली कडे व काही दक्षिणेतील भाग असतील या ठिकाणी जास्त प्रमाणात ढगाळ वातावरण होऊन हलक्या थेंब पडण्याची शक्यता आहे. उद्यापासून हळूहळू राज्यात वातावरणात बदल होईल खास करून 27 तारखेला मध्यम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये आपल्याला मेघ गर्जन्स वादळीवास पाऊस आणि गारपीट पाहायला मिळणार आहे.
पजाबराव डख यांचा हवामान अंदाज ?
पजाबराव डख यांच्या अंदाजानुसार राज्यामध्ये 27 डिसेंबर 28 आणि 29 डिसेंबर राज्यात अवकाळी पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पाऊस येणार आहे निश्चित म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांचा कांदा काढणी चालू असेल उद्यापर्यंत तुम्ही काय करा कांदा झाकून ठेवायची तयारी ठेवा ज्यांची मका उघड्यावर असेल तर मका देखील झाकण्याची तयारी ठेवा म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे 27 28 29 म्हणजे शुक्रवार शनिवार आणि रविवार पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा आणि तो पाऊस सांगायचं झालं तर तुम्ही बघू शकता म्हणजे परवाच्याला म्हणजे तो पाऊस येणार आहे इकडून यवतमाळ म्हणजे 27 तारखेला म्हणजे मध्य म्हणजे 26 तारखेलाच मध्यरात्री म्हणजे उद्या मध्यरात्री ते यवतमाळ नांदेड इकडे पाऊस सुरू झालेली आहे आणि लगेच शुक्रवारच्या नंतर तो पाऊस तिथून पुढं इकडे नांदेड जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा हिंगोली जिल्हा अकोला जिल्हा वाशिम जिल्हा त्याच्यानंतर अकोट शेगाव खामगाव त्याच्यानंतर अचलपूर अमरावती अमरावती त्याच्यानंतर जळगाव जामोद संग्रामपूर त्याच्यानंतर देवळगाव राजा त्याच्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार त्याच्यानंतर निफाड मालेगाव नाशिक चाळीसगाव संभाजीनगर कन्नड भोकर्दन भोकर्दन त्याच्यानंतर पैठण श्रीरामपूर शिर्डी शिर्डी राहता राहता नगर जिल्ह्यामध्ये मध्ये संगमनेर त्याच्यानंतर तो पाऊस परत इकडं बीड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा त्याच्यानंतर पंढरपूर तुळजापूर सोलापूर जत पुन्हा कर्नाटक मध्ये काही पुन्हा सांगलीकडे जाईल सांगलीकडे फक्त 27 तारखेपर्यंतच राहणार असा अंदाज पंजाबराव डक यानी वर्तविला आहे.
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.
