महिला शिक्षकांची खंत ! रोष कुणावर ? काय सरकार यांच्याकडे लक्ष देईल ?

काय खरच दुर्लक्ष होतय महिला शिक्षकाच्या समस्यांवर ?

लाडक्या बहिनीना पैसे मिळत आहेत मात्र आमचे काय ? आम्ही कुठाला गुन्हा केलाय असा सवाल आज शिक्षिका करित आहेत. कशामुळे ह्या शिक्षिका त्रस्त झालेल्या आहेत काय आहेत कारणे !

महिला शिक्षकांची खंत !

बाकीच्या देशामध्ये शिक्षणावर जास्त प्रमाणात लक्ष केंद्रीत केले जाते आणि आपल्याकडं केवळ शिक्षण बाजूला ठेऊण बाकीच्या गोष्टीवर जास्त लक्ष दिले जात आहे तर लाडका भाऊ जो असतो ना ती ओवाळणी आहे आणि आपल्या खिशातून काढून देत असतो लाडका भाऊ दुसऱ्यांना मागून दुसऱ्यांचे पगार असं वळवून देत नाही असं मत आज शिक्षिकांचे झालेले आहे. आज ओवाळणी देत प्रत्येक गोष्टीला तुम्ही शिक्षकाकडून काम करून घेताय आणि शिक्षकांचे पगारच का देत नाही प्रत्येक वेळेस शिक्षकांवरच अन्याय का ? तुमची मुलं आम्ही घडवतो आणि तुम्ही आम्हाला उपाशी ठेवताय नवीन वर्षात स्वागत कसं रडत करायचं का हसत करायचं हा आमचा मोठा प्रश्न आहे ? आमदार खासदाराचा साधा चहा पाण्याचा खर्च तुमचा एक-दहा हजार रुपये कटामध्ये होतो आणि आम्ही दहा दहा हजार वर महिना काढतो मग तेपण तुम्ही महिना देत नाही. मग आम्ही करणार काय ?

का आहेत शिक्षक त्रस्त ?

आमच्या ज्या पगारी थांबवल्यात त्या पगार न थांबवता आमच्या पगारी चालू कराव्यात मग त्या सरकारने लाडक्या बहिणीला पैसे कसे द्यायचे कुठून द्यायचे किंवा त्यांचा स्वतःचा पगार त्यांनी थांबवावा स्वतःच्या पगार होतं त्यांनी द्यावा या सगळं हे चित्र बघितलं ना आम्हाला वाटतं नक्कीच आम्ही एक नाही तर 1 लाख टक्के आम्ही सरकारच्या लाडक्या बहिणी नाहीये ! आम्ही सरकारच्या लाडक्या म्हणजे दोडक्या बहिणी आहोत असं आम्हाला स्वतः वाटतं. ज्यावेळेस स्वतःच्या खिशात जातना त्यावेळेस कळतं असं ! मन जी मन आहे, ती सरकारने स्वतः पहिल्यांदा अमलात आणावी मग आम्हाला सांगावं असे मत आज अनेक शिक्षिकांचे झालेले आहे तसेच महाराष्ट्र राज्यातील लाडकी बहिण योजना ही अतिशय सुप्रसिद्ध झालेली आहे, महायुती सरकारचं यश येण्यामागे लाडक्या बहिणींचा मोठा हात आहे असं सांगितलं जातंय परंतु सोलापूर जिल्ह्यातील काही लाडक्या बहिणी ज्या शिक्षिका आहेत शिक्षिका असल्यामुळे ह्यांना लाडक्या बहिणीचा देखील मोबदला मिळाला नाही सरकारी कर्मचारी असल्यामुळे तर आता यंदाच्या वेळेस जे आहे तुमच्या पगारी थांबलेल्या आहेत.

महिला शिक्षिकांचा रोष कुणावर ?

महिला शिक्षिकांचा नेमका रोष कुनावर आहे असे जेव्हा काहि शिक्षिकेना प्रश्न विचारन्यात आला तेव्हा त्यानी असे उत्तर दिले कि, आम्हाला असं वाटत नाही की आम्ही सरकारच्या लाडक्या बहिणी आहोत कारण जर आम्ही लाडक्या बहिणी असत्या तर आमचं त्यांनी सरकारमध्ये समाविष्ट केले असते म्हणजेच ज्या योजना मिळतात त्या योजनामध्ये आम्हाला समाविष्ट केलेले नाही. मुळात मग आमचा पगार आम्हाला आता कळलं की आमचा पगार का थांबवला तर हा पैसा जो आमचा आहे, तो तिकडं म्हणजे लाडक्या बहिणीना दिला का कशासाठी दिला तुम्ही सरकारने कोणत्याही योजनेत आम्हाला त्याचा विरोध नाही आम्ही कुठलाही विरोध करणार नाही कोणत्याही योजनेमध्ये द्या पण त्यांना पैसे दिले, हरकत नाही पण आमचे पैसेच का वळवले त्यांनी तिकडं आमच्या शिक्षकांचेच पैसे का वळवले एक तर आम्ही 20% 40% अनुदाने शिक्षक आहोत, आमचा पगार एक तर मुळात होत नाहीत कोरोनाच्या अगोदर नंतर झाला परत त्याच्यानंतर आता असं झालंचा आता आम्ही कुनाकडे आणि कशी मागनी करायची हाच आमच्या पुढचा महत्वाचा प्रश्न आहे ? असे मत काहि शिक्षिकेंचे बनले आहे.

नेमक्या काय आहेत महिला शिक्षिकेच्या मनातील भावना ?

शिक्षिका सुध्दा सरकारच्या लाडक्याच बहिनी आहेत म्हणजे आता सरकारला सगळ्या थोडक्यात लाडक्याच आहेत त्या शिक्षिका असो किंवा घरी बसणाऱ्या आमच्या सारख्या असो पण सरकारने थोडसं आमच्याकडेही लक्ष देऊन आमची पीडा जाणून घ्यावी त्यासोबतच अनाठाई खर्च कमी करून नियोजन करून सरकारने या सगळ्यांची तक्रार दूर केली पाहिजे असे मत शिक्षिकेनी व्यक्त केली त्यासोबतच आमच्या मताचा सरकार नक्की विचार करेल असं खात्री शिंक्षिकेंची आहे, सोलापुरातील जिल्ह्यातील महिला शिक्षक त्या स्वतःला म्हणजे लाडक्या बहिणी पण समाज आणि सरकारकडे जोडक्या बहिणी आहे का अशी संतप्त प्रतिक्रिया त्यानी दिलेली आहे.

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….

YouTube Subscribe Now
फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप 
व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप 
टेलिग्राम जॉईन करा
Share Chat जॉईन करा

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *