Summer Health Tips उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी रामबान उपाय! तुम्हाला याबद्दल माहीती आहेका ?
उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी एक रामबान उपाय Summer Health Tips च्या माध्यमातुन जानुन घेनार आहोत वाळा या वनस्पति बद्दल आपण उन्हापासून कसा बचाव करु शकतो – हे रामबाण उपाय आहेत!
Summer Health Tips वाळा: नैसर्गिक AC! उन्हाळ्यातील आपण विसरलेलो देणगी, जी शरीराला थंडावा देते
आजच्या आधुनिक जगात वाळ्याचा जरी विसर पडला असला, परंतू पूर्वीचं सोनं आजही उपयुक्त तेवढच उपयुक्त आहे जेवढे आधी होते, आज बहुतांश लोकांच्या घरांमध्ये फ्रीजचं पाणी आज सर्वत्र उपलब्ध असलं, तरी पूर्वी लोक उन्हाच्या उष्णतेपासुन स्वताच्या शरीराला नैसर्गिक थंडावा देण्याकरिता वाळा वापरत असायचे. उन्हाळ्यातील उष्णता, डिहायड्रेशन, थकवा यावर एक नैसर्गिक उपाय म्हणून वाळा एक प्रभावी उपाय ठरू शकतो.
🌿 वाळा म्हणजे काय? खस सरबतापासून थेट औषधापर्यंतचा प्रवास
वाळा ही एक प्रकारची सुगंधित औषधी वनस्पती आहे, जी शरीरासाठी वरदान आहे
वाळा (खस) ही एक गवत प्रवर्गातील वनस्पती असून याचा उपयोग केवळ सरबतासाठीच नाही, तर शरीराला नैसर्गिक स्वरुपात थंड ठेवण्यासाठीही होतो. खस सरबताचा प्रकार हा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अत्यंत लोकप्रिय असा प्रकार आहे तरी आपण याचा वापर दररोज प्यायल्यास शरीराला ‘कूलिंग इफेक्ट’ मिळतो.

💧 फ्रिजचं पाणी VS वाळ्याचं पाणी – शरीरासाठी नेमक काय आहे फायदेशीर?
आज आपल्याला थोडकं समाधान हव आहे की दीर्घकाळचा फायदा हवा आहे हे शोधन गरजेच झालेल आहे ?
आपल्याला तहान लागली तर आपण लगेच फ्रिजचं पाणी तहान पुर्ण करण्यासाठी वापरतो पण त्यानंतर पुन्हा तहान लागते हे आपल्या सर्वाना माहीतच आहे. परंतू वाळ्याचं पाणी शरीराला हायड्रेट ठेवतं, तसेच याचे प्राशन केल्याने तहान कमी लागते आणि शरीरातील उष्णता नियंत्रणात राहते.
Summer Health Tips 🥣 वाळ्याचं पाणी बनवावयाची सोपी पद्धत?
याचा नैसर्गिक लाभ आता घरीच बनवा थंड आणि गुणकारी वाळ्याचं पाणी आपल्या शरीराकरिताही अत्यंत लाभकारी याला बनवण्याची अत्यंत सोपी पध्दत काय ?
- सर्वप्रथम वाळ्याच्या मुळा स्वच्छ धुऊन घ्याव्यात व त्यानंतर
- रात्रभर ते पिण्याच्या पाण्यात भिजवा म्हणजे त्यामधिल अर्क पाण्यात उतरेल
- दुसऱ्या दिवशी ते पाणी दिवसभर आपण प्यायला वापरू शकतो.
- तचे महत्वाचे म्हणजे हेच मुळे आपण 3 ते 4 वेळा वापरु शकतो.
- नंतर या मुळांचा वापर आपण स्क्रबरसारखा त्वचेवर करु शकतो.
टिप: जर आपण माठात पाणी ठेवले तर ते अधिक चवदार आणि थंड असते!

🛡️ रोगप्रतिकारक शक्तीपासून त्वचेपर्यंत – वाळ्याच्या पाण्याचे 10 फायदे
वाळ्याचे पाणी म्हणजे एक नैसर्गिक आरोग्यदायी पेय आहे तसेच याचा शरीराकरिता सुध्दा जास्त प्रमानात लाभ होतो हे आपल्याला माहिती आहेका ? याचे 10 प्रकारचे फायदे याबद्द्ल माहीती खालीलप्रमाणे दिलेली आहे.
- अँटीऑक्सिडेंट्सने भरलेलं
- रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो
- डोळ्यांच्या जळजळीवर गुणकारी
- लोह, मॅगनीज, विटामिन B युक्त
- रक्ताभिसरण सुधारतो
- रक्तदाब नियंत्रणात ठेवतो
- त्वचेला चमक येते
- उन्हाळ्यात टवटवीत वाटतं
- युटीआय आणि लघवीतील इन्फेक्शनवर उपयोगी
- ताप कमी करण्यास मदत
नैसर्गिक थंड पाणी मिळवण्यासाठी काय करावे ?
उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नैसर्गिक थंड पाणी मिळण किंवा तयार करने कसरतीचे काम आहे ते कसे करावे याबद्दल आपण माहिती मिळवनार आहोत. सर्वप्रथम आपण आपल्या घरी मातीचं भांडं वापरावे + त्यामध्ये वाळा हे वनस्पति वापरा याचा वापर करुन आपन = उत्तम प्रकारे घरामध्ये नैसर्गिक शितपाणी तयार करु शक्तो. जे आरोग्याकरिता उत्तम प्रकारे उपयोगाचे ठरनार आहे. कारण मातीच्या भांड्यात अथवा माठामध्ये ठेवलेलं पाणी आधीच थंड असतं. त्यामध्ये वाळा चा वापर केल्यानंतर त्याचे फायदे दुपटीने वाढतात. अशा प्रकारे दररोज वाळ्याचं पाणी प्यायल्यास उन्हाळ्याच्या कोणत्याही त्रासापासून आपल्याला मुक्ती मिळण्यास मदतच होईल.
आता तुमच्याकरिता तुम्ही सांगा तुमच्या गावात वाळ्याला काय म्हणतात? आम्हाला त्याबद्दल खाली कमेंट करा!
आपल्याला माहितच आहे ज्याप्रमाणे या वनस्पतीला वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी नाव आहेत, तसंच तिचे उपयोगही अनेक प्रकारचे आहेत. तुमच्या भागात वाळ्याला काय म्हणतात, हे आम्हाला खाली कमेंटमध्ये जरूर सांगा.
तसेच आमच्या देशवार्ता वॉट्स अॅप चॅनलला फॉलो करा आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका!
तुम्हाला आनखी कशाबद्दल जानुन घ्यावयाचे आहे ते आम्हाला कमेंट च्या माध्यमातुन कळवा आम्ही जरूर त्यावर सुध्दा माहीती प्रसिध्द करु.
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.
