|

नगरसेवकांना किती मानधन, भत्ते आणि सुविधा मिळतात? जाणून घ्या सविस्तर माहिती Nagarsevak Benefits

Nagarsevak Benefits नगरसेवकांना मानधन किती मिळते? बैठक भत्ता, प्रवास भत्ता, सुविधा आणि विकास निधी याबाबत सविस्तर माहिती वाचा.

Nagarsevak Benefits: मानधन किती? भत्ते आणि विकास निधी माहिती

राज्यामध्ये नगर परिषदेच्या निवडनुका संपल्या आहेत व् महानगरपालिका निवडनुका सुरु आहेत या अनुशंगाने प्रत्येक नागरिकाच्या मनात प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे नगर सेवाकाचे मानधन किती ?

कुठल्याही अवस्थेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधील तेथील नगरसेवक हा लोकशाहीचा कणा मानला जातो. त्याच्यामार्फत नागरिकांच्या समस्या मांडणे, शहराच्या विकासासाठी निर्णय घेणे सोबतच तेथील प्रशासनावर नियंत्रण ठेवणे ही जबाबदारी नगरसेवकांवर असते. मात्र, अश्या प्रकारच्या कामासाठी नगरसेवकांना किती मानधन दिले जाते, तसेच त्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतात, याबाबत अनेक नागरिकांमध्ये उत्सुकता असते.

Nagarsevak Benefits नगरसेवकांना किती मानधन मिळते?

राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांमध्ये प्रभागातिल नगरसेवकांना दरवर्षी मानधन स्वरूपात निश्चित रक्कम दिली जाते. सर्वसाधारणपणे प्रभागात कार्यरत असणार्या नगरसेवकांना सुमारे 90,000 ते 1,75,000 रुपये असे वार्षिक मानधन मिळते. हे मानधन त्याना महापालिकेच्या वर्गवारीनुसार (अ, ब, क, ड) बदलते. तसेच इतर महापौर, उपमहापौर, सभापती यांना यापेक्षा अधिक मानधन मिळते.

Nagarsevak Benefits & Traveling Charges बैठक भत्ता व प्रवास भत्ता

राज्यातील नगरसेवकांना मानधनाव्यतिरिक्त काही अतिरिक्त भत्ते दिले जातात—

  1. नगरसेवाकांचा बैठक भत्ता किती असतो ?

नगर सेवाकाला त्याच्या प्रत्येक सर्वसाधारण सभा किंवा समितीच्या बैठकीसाठी साधारणत 500 ते 1,000 रुपये प्रति बैठक प्रमाणे देण्यात येतो.

  1. नगरसेवाकांचा प्रवास भत्ता किती असतो ?

नगर सेवकाने त्याच्या प्रभागातिल अधिकृत कामासाठी प्रवास केल्यास त्याला नियमांनुसार भत्ता किंवा वाहन सुविधा उपलब्ध होतो.

नगरसेवकांना इतर सुविधा काय मिळतात?

नगरसेवकांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात—

नगरसेवक ह्याचा महापालिकेच्या समित्यांमध्ये सहभाग असतो. त्याला विकासकामांसाठी निधी शिफारस करण्याचा अधिकार आहेत. आपल्या प्रभागातिल नागरिकांच्या तक्रारी प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा अधिकार हा नगरसेवकास आहे. तसेच त्याना काही ठिकाणी मोबाईल, पत्रव्यवहार व कार्यालयीन सुविधा मिळतात.  अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे नगरसेवकांना नियमित पगार दिला जात नाही, तर केवळ मानधन व भत्त्यांवर त्यांचे काम चालते.

नगरसेवकांचा विकास निधी किती असतो ?

जिल्हा तालुक्यातील नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील विकासकामांसाठी विकास निधी दिला जातो. जो साधारणतः दरवर्षी 3 ते 5 कोटी रुपये इतक्या स्वरूपात असतो जो त्याना विकासकामांसाठी उपलब्ध करुण दिला जातो. हा सम्पूर्ण निधी त्याना रस्ते, पाणीपुरवठा, गटारे, स्ट्रीट लाईट, समाजभवन आदी कामांसाठी वापरावा लागतो.

नगरसेवक व् त्याच्या विविध समित्यांमधील भूमिका ?

नगरसेवक— हा स्थायी समिती मध्ये तसेच, प्रभाग समिती, व् विषय समित्याचा सदस्य असतो. यामध्ये त्याला सदस्य म्हणून काम पहावे लागते. या समित्यांमधून आपल्या शहराच्या आर्थिक, प्रशासकीय आणि विकासात्मक निर्णयांवर प्रभाव टाकला जातो.

निष्कर्ष

नगरसेवकांना मिळणारे मानधन फार मोठे नसले, तो निवडून आल्या नंतर त्यांच्या हातात असलेली विकास निधीची जबाबदारी आणि निर्णयक्षम अधिकार क्षमता अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे नगरसेवक पद हे केवळ मानधनासाठी नव्हे, तर सेवेच्या भावनेतून काम करण्याचे पद मानले जाते.

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….

YouTube Subscribe Now
फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप 
व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप 
टेलिग्राम जॉईन करा
Share Chat जॉईन करा

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *