Amravati to Mumbai विमानसेवा सुरू: वेळापत्रक, तिकीट दर आणि सर्व माहिती
Amravati to Mumbai विमानसेवा सुरू: वेळापत्रक जाहीर, तिकीट दर किती पहा सर्व माहिती
१६ एप्रिलपासून अमरावती-मुंबई विमानसेवा होईल सुरू! वेळापत्रक, तिकीट दर, बुकिंग सम्पुर्ण माहिती व उद्घाटन समारंभाची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी वाचा.
Amravati to Mumbai विमानसेवा १६ एप्रिलपासून सुरू; वेळापत्रक, तिकीट दर आणि इतर सविस्तर माहिती जाणून घ्या
अमरावती : विदर्भातील महत्त्वाचे शहर म्हणुन ओळख असलेल्या अमरावतीकरांसाठी एक अत्यंत महत्वाची व आनंदाची बातमी आहे. आता सामान्य मानसाला अमरावतीहून थेट मुंबईला विमानाने प्रवास करता येणार आहे. अलायन्स एअर कंपनीकडून मुंबई-अमरावती-मुंबई अशी नियमित विमानसेवा सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे अमरावती करांसाठी निश्चितच ही बातमी आनंदाची आहे ही सेवा १६ एप्रिल २०२५ पासून सुरू होणार असून, यामुळे आता प्रवाशांचा वेळ आणि मेहनत दोन्ही वाचणार आहेत.
Amravati to Mumbai विमानसेवा उद्घाटनाचा विशेष सोहळा
अमरावती-मुंबई या विमानसेवेचा शुभारंभ येत्या १६ एप्रिल रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्त अमरावती विमानतळावर १६ एप्रिल रोजी भव्य लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला असून, या सोहळ्याला राज्याचे अनेक मंत्री, खासदार, आमदार आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. ही सेवा सुरु केली जानार आहे व याला ‘उडान’ (UDAN – उडे देश का आम नागरिक) या केंद्र सरकारच्या प्रादेशिक संपर्क योजनेअंतर्गत सुरू केली जात आहे.
अमरावती-मुंबई विमानसेवेचे वेळापत्रक
या सेवेच्या सुरुवातीला आठवड्यात तीन दिवस – सोमवार, बुधवार आणि शुक्रवार – ही सेवा सुरू राहणार आहे. व नंतर पुढे प्रवाशांची संख्या वाढल्यास विमानांची फ्रीक्वेन्सी वाढवली जाईल अशी माहिती या एअर कम्पनीमार्फत देण्यात आलेली आहे. या सेवेचे प्रारंभिक वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
- १६ एप्रिलसाठी:
- मुंबईहून अमरावतीकडे – सकाळी ८.४५ वाजता
- अमरावतीहून मुंबईकडे – सकाळी ११.३० वाजता
- १८ एप्रिलपासून नवे वेळापत्रक लागू:
- मुंबई ते अमरावती – दुपारी २.३० वाजता प्रस्थान, ४.१५ वाजता आगमन
- अमरावती ते मुंबई – दुपारी ४.४० वाजता प्रस्थान, सायंकाळी ६.२५ वाजता आगमन

अमरावती-मुंबई विमानसेवा तिकीट दर किती असणार?
अलायन्स एअर कंपनीने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर बुकिंगची सुविधा नागरिकांकरिता उपलब्ध करून दिली आहे. तसेच यासंदर्भातील तिकीट दर सुरुवातीस किफायतशीर ठेवण्यात आले आहेत, मात्र गर्दीच्या काळात तिकीट दर वाढू शकतात.
- आताच्या घडीला किमान तिकीट दर: ₹२,१०० राहतील.
- जास्तीत जास्त दर: ₹३,८६४ (उदाहरणार्थ १८ एप्रिलसाठी) राहण्याचा अंदाज आहे.
अमरावती-मुंबई विमानसेवेकरिता ATR-72 प्रकारचं लहान प्रवासी विमान वापरण्यात येणार आहे, जे लघु अंतराच्या प्रवासासाठी उपयुक्त आणि सुरक्षित मानलं जातं. त्यामुळे कमी अंतर असल्यामुळे या विमानाचा वापर करण्यात येणार आहे.
अमरावतीकरांसाठी मोठं पाऊल
ही विमानसेवा अमरावतीकरांसाठी केवळ एक प्रवासाची सुविधा नसून, हे शहर आता अधिक विकसित व त्यासोबतच कनेक्टेड बनत असल्याचं प्रतीक आहे. जिल्ह्यातील व आजुबाजुतिल व्यवसायिक, विद्यार्थी, शासकीय अधिकारी यांना याचा विशेष लाभ होणार आहे. या सर्वांची आता वेळ आणि पैशाची बचत होऊन मुंबईशी थेट संपर्क निर्माण होणार आहे.
या विमानसेवेमुळे अमरावती आता अधिक जवळ येणार आहे – केवळ अंतरानेच नाही तर विकासाच्या दृष्टीनेही. येत्या काळात राज्यातील व विदर्भातील इतर शहरांसोबतही अशीच विमानसेवा सुरू होईल, अशी अपेक्षा नागरिकांमध्ये आहे.
अलायन्स एअर इंडिया कम्पनी ?
अलायन्स एअर इंडिया कम्पनी हि रीजनल म्हणजेच स्थानीक पातळवरिल कम्पनी आहे ही भारतातील एक विमानवाहतूक कंपनी आहे. या कम्पनीची सुरुवात अलायन्स एर या नावाने झाली. ज्याला आपण अलायन्स एअर इडिया असे म्हणतो ज्याची स्थापना १९९६ मध्ये इंडियन एरलाइन्सची (नंतर २००७ मध्ये एर इंडियामध्ये विलीन झाली) उपकंपनी म्हणून करण्यात आली आणि मुख्यतः देशांतर्गत मार्ग चालवते.
टिप: ही बातमी वाचून आपल्याला अमरावतीहून मुंबई विमानसेवा सुरू होण्याबाबत सविस्तर माहिती मिळाली असेल. अधिकृत बुकिंगसाठी अलायन्स एअरच्या संकेतस्थळाला भेट द्या.
येथे क्लिक् करा
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.
