|

Dr. Babasaheb Ambedkar यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या महान कार्याला अभिवादन करणारा विशेष लेख

Dr. Babasaheb Ambedkar यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या महान कार्याला अभिवादन 

Know about Dr. Babasaheb Ramaji Ambedkar’s inspiring journey, संविधान निर्माण मध्ये त्यांचे योगदान आणि सामाजिक सुधारानेचे महान कार्य।

समता, स्वातंत्र्य आणि बंधुता व न्यायाचा संदेश देणाऱ्या बोधिसत्व Dr. Babasaheb Ambedkar यांच्या कार्याचा उजाळा

आज संपूर्ण जगभरात Dr. Babasaheb Ambedkar यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त विविधांगी कार्यक्रम, तसेच अभिवादन आणि अनेक उपक्रमांच्या माध्यमातून Dr. Babasaheb Ambedkar यांच्या कार्याला सर्वत्र उजाळा दिला जात आहे. सामाजिक न्याय, समता आणि मानवाधिकार यासाठी आयुष्यभर झटलेल्या या महामानवाच्या कार्याची आठवण आजही समाजाला प्रेरणा देत आहे.

Dr. Babasaheb Ambedkar यांचा जन्म कोठे झाला ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील मऊ येथे झाला. त्यानी त्यांच्या जीवनात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून उच्च शिक्षण घेतले आणि कोलंबिया विद्यापीठ तसेच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे शिक्षण पूर्ण करून ते एक प्रखर विद्वान व विचारवंत बनले.

Dr. Babasaheb Ambedkar यांचे सामाजिक योगदान ?

आज सम्पूर्ण जग त्याना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखते त्यांनी भारतासारख्या अनेक धर्मं प्रजातिंच्या देशाला एक सशक्त, समताधिष्ठित आणि लोकशाही पद्धतीचे सशक्त संविधान दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. त्यांनी समाजातील शोषित, वंचित, बहुजन आणि मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी आपल्या जीवनभर मोठा लढा दिला व् तो यशस्वी केला.

Dr. Babasaheb Ambedkar यांच्या सामाजिक संघटना कोणत्या ?

त्यांनी त्यांच्या बुद्धि सामर्थ्यच्या जोरावर बहुजन समाजाला ‘शिक्षण घ्या, संघर्ष करा व् संघटित व्हा’ हा मोलाचा संदेश देत समाजाला जागृत केले. त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, समता सैनिक दल यांसारख्या संस्थांची स्थापना करून त्यांनी शिक्षणाचा व सामाजिक ऐक्याचा प्रसार केला.

Dr. Babasaheb Ambedkar यांनी हिन्दू कोड बिल कधी सादर केले ?

त्यांच्या अतुलनीय योगदाना बद्दल विशेष म्हणजे महिलांच्या हक्कांसाठी १९५१ मध्ये त्यांनी हिंदू कोड बिल सादर केले, जे त्या काळात अतिशय क्रांतिकारी पाऊल होते. तसेच, त्यांनी देशाच्या आर्थिक धोरणांमध्येही भारतीय रिजर्व्ह बैंक च्या माध्यमातून महत्त्वपूर्ण योगदान दिले, ज्यामुळे भारताच्या विकासाला दिशा मिळाली.

Dr. Babasaheb Ambedkar यांनी बौध धम्माची दिक्षा कधी आणि कोठे घेतली?

१४ ओक्टोबर 1956 रोजी नागपुर येथे त्यांनी आपल्या लाखों अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारून देशामध्ये सामाजिक परिवर्तनाचे क्रांतिचे बिगुल वाजविले. त्यांच्या या निर्णयामुळे समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाचा संदेश अधिक दृढ झाला.

आज १४ अप्रिल रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त देशाभारामध्ये विविध ठिकाणी रॅली, प्रबोधन भाषणे, निबंध स्पर्धा, अभ्यासिका आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यांच्या विचारांचे महत्त्व आजच्या आधुनिक समाजातही तितकेच अधोरेखित होते आहे.

बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे त्यांच्या जिवनातील कार्य हे केवळ एका व्यक्तीचे नसून संपूर्ण मानवजातीसाठी आज मार्गदर्शक ठरत आहे. त्यांच्या विचारांचा अवलंब करूनच समाजात खरी समता आणि न्याय प्रस्थापित होऊ शकते.

आजच्या या मंगल दिनी त्यांच्या अतुलनीय योगदानाला बहुमूल्य कार्याला मानाचा मुजरा त्यांच्या कार्या बद्दल समाज त्यांच्या सदैव वृणी राहिल…जय भीम…

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….

YouTube Subscribe Now
फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप 
व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप 
टेलिग्राम जॉईन करा
Share Chat जॉईन करा

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *