Sunita Williams अंतराळातील वेतन आणि ओव्हरटाइम – किती मिळतात NASA कडून त्यांना पैसे?
Sunita Williams ह्या अंतराळात काम करून किती वेतन व ओव्हरटाइम कमावतात? जाणून घ्या NASA कडून मिळणाऱ्या पगाराची संपूर्ण माहिती, त्यांच्या अनुभवावर आधारित वेतन संरचना आणि अधिक माहिती!
Sunita Williams अंतराळवीरांचे वेतन किती असते? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
अंतराळात जाणे NASA मध्ये जॉब करने हे बहुतांश लोकांचे स्वप्न असते तसेच अश्या ठिकानी नोकरी करने हा एक अद्वितीय आणि थरारक अनुभव सुध्दा असतो. मात्र, अंतराळवीरांचे वेतन, त्यांना मिळणारे भत्ते, आणि ओव्हरटाइमविषयी अनेकांना याबद्दल फारशी माहिती नसते किवा सामान्य लोकाना याबद्दल माहीती नाही. विशेषतः भारतवंशीय अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या कमाईविषयी लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आपण हा लेख आपल्याला सुनीता विल्यम्स यांच्या अंतराळातील वेतनाविषयी आणि त्यासोबतच ओव्हरटाइमसाठी मिळणाऱ्या पैशांविषयी सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करित आहोत.
सुनीता विल्यम्स ह्या अमेरिकेच्या नासा (NASA) अंतराळ संशोधन संस्थेच्या एक प्रतिष्ठित अंतराळवीर आहेत. त्यांनी आत्तापर्यंत दोन वेळा अंतराळ प्रवास केला असून, त्यांनी तब्बल 321 दिवस, 17 तास आणि 15 मिनिटे अंतराळात घालवले आहेत. त्याना ह्या क्षेत्राचा दांडगा अनुभव असल्याचे देखील बोलले जाते.

NASA मधील अंतराळवीरांचे वेतन कसे ठरते?
नासा आपल्या अंतराळवीरांचे वेतन ‘जनरल शेड्यूल पे स्केल’ (GS Pay Scale) नुसार ठरवते. यामध्ये अनुभव, जबाबदारी आणि कामाच्या स्वरूपानुसार वेतनवाढ होते. साधारणतः अंतराळवीरांना GS-12 ते GS-13 या ग्रेडमध्ये ठेवले जाते.
GS-12 स्तरावरील वार्षिक वेतन: 66,000 डॉलर म्हणजेच भारतीय रुपयाप्रमाने (सुमारे 54 लाख रुपये)
GS-13 स्तरावरील उच्चतम वेतन: 144,566 डॉलर तर रुपयाप्रमाने (सुमारे 1.17 कोटी रुपये)

सुनीता विल्यम्स यांचे प्रतिदिन वेतन किती?
सुनीता विल्यम्स हे नाव आताच्या घडीला चर्चेमध्ये आहे त्यामुळे त्याना नेमके किती पगार व भत्ते मिळतात हा चर्चेचा विषय ठरत आहे. जर आपण साधारणपणे GS-13 ग्रेडनुसार वेतनाचा विचार केला, तर सुनीता विल्यम्स यांना दररोज साधारणतः 2090 ते 2199 डॉलर म्हणजेच भारतीय रुपयामध्ये (सुमारे 1.74 ते 1.83 लाख रुपये) प्रतिदिवस मिळतात.
अंतराळवीरांना ओव्हरटाइम मिळतो का?
होय, नासामध्ये अंतराळवीरांना ओव्हरटाइम दिला जातो. अंतराळात असताना ते दररोज 10 ते 12 तास काम करतात. यात प्रयोग करणे, अवकाशयानातील उपकरणे हाताळणे, विज्ञान संशोधन, आणि पृथ्वीवरील तज्ञांशी संपर्क साधणे यांचा समावेश असतो.
ओव्हरटाइमसाठी प्रति तास अतिरिक्त मोबदला: नियमित वेतनाच्या 1.5 पट अधिक असतो.
अंतराळ मोहिमेदरम्यान मिळणारे एकूण वेतन किती?
सुनीता विल्यम्स यांनी आत्तापर्यंत अंतराळात 321 दिवस घालवले आहेत. आता यानुसार त्यांचा रोजचा पगार लक्षात घेतला, तर त्यांनी अंतराळात असताना सुमारे 7 ते 9 कोटी रुपये कमावले असण्याची शक्यता आहे.
अंतराळवीरांना मिळणारे अतिरिक्त फायदे ?
अंतराळवीरांना केवळ मोठे वेतनच नव्हे, तर NASA अंतराळवीरांना अनेक प्रकारचे अतिरिक्त फायदे आणि सुविधा देण्यात येतात. यामध्ये –
- मोफत वैद्यकीय सेवा
- जीवन विमा आणि निवृत्ती योजना
- फ्लाइट भत्ता आणि प्रवास सुविधा
- प्रशिक्षण आणि संशोधनासाठी विशेष अनुदान
अंतराळवीर होण्यासाठी काय करावे लागते?
NASA मध्ये अंतराळवीर बनण्यासाठी अत्यंत कठीण प्रशिक्षण असते. यामध्ये–
- शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते किंवा येने गरजेचे आहे.
- अवकाशयान हाताळण्याचे आणि स्पेससूट वापरण्याचे प्रशिक्षण असावे.
- मानसिक तणाव हाताळण्याच्या क्षमता चाचण्या पुर्ण कराव्या लागतात.
- पाण्यात आणि गुरुत्वाकर्षणविरहित परिस्थितीत वावरण्याचा सराव करावा लागतो.
सुनीता विल्यम्स यांनी या सर्व कठीण प्रक्रियेतून मार्ग काढला आणि अंतराळवीर म्हणून आपले स्थान निर्माण केले.
भविष्यातील अंतराळ मोहिमा आणि नवीन संधि ?
सुनीता विल्यम्स यांचा एक अनुभवी अंतराळवीरांच्या यादिमध्ये त्यांचा समावेश होतो व भविष्यातील काही महत्वाच्या अंतराळ मोहिमांमध्येसुध्दा नियुक्ती होण्याची शक्यता आहे. 2025-26 मध्ये होणाऱ्या ‘आर्टेमिस’ मोहिमेत त्या सहभागी होऊ शकतात. ही मोहीम मंगळावर मानवी वस्ती निर्माण करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल असेल असे बोलले जात आहे.
निष्कर्ष – अंतराळवीरांचे जीवन रोमांचक पण आव्हानात्मक!
सुनीता विल्यम्स यांचे वेतन आणि त्यांच्या कामाचा आवाका हा निश्चितच प्रभावी आहे. मात्र, एक गोष्ट समजुन घेने महत्वाचे आहे हे क्षेत्र केवळ मोठ्या वेतनासाठी नाही, तर याकरिता जबरदस्त मेहनत, कष्ट, आणि शिस्त यांची मागणी करते. भविष्यात आणखी भारतीय अंतराळवीर या क्षेत्रात पुढे येतील, अशी अपेक्षा बाळगूया!
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.
