मार्चमध्येच राज्यात उष्णतेचा कहर ! ५ वर्षांनंतर मार्च महिन्यात सर्वाधिक तापमान; अकोल्यात पारा ४०.७° Temperature News
5 वर्षांनंतर मार्च महिन्यात सर्वाधिक तापमान; अकोल्यात पारा ४०.७° Temperature News राज्यामध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उष्णतेची तीव्र लाट जाणवत असून अनेक शहरांमध्ये तापमान हे ४० अंशांच्या पुढे गेलेले दिसत आहे. तर अकोला येथे ४०.७° सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसांसाठी उष्णतेचा इशारा.
Temperature News राज्यात उष्णतेचा कहर! राज्यातील अनेक शहरांत पारा ४० अंशांच्या पुढे
सम्पुर्न राज्यात मार्च च्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असून अनेक जिल्ह्यात तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. विशेषतः राज्यामध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उष्णतेची तीव्र लाट सर्वत्र जाणवत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार यंदा गेल्या पाच वर्षांनंतर मार्च महिन्यात इतक्या उच्च तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
Temperature News गेल्या ५ वर्षांनंतर मार्च महिन्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; कोकण आणि विदर्भात उष्णतेची तीव्र लाट
राज्यातील मुंबई व आसपासच्या कोकण परिसरात बुधवारी कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असल्याने यंदा मार्च महिन्यातील हे सर्वाधिक तापमान असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. दररोज सकाळपासूनच वातावरणात उष्णता वाढत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे तसेच दुपारच्या वेळेत रस्त्यांवर तुलनेने कमी वर्दळ दिसून येत आहे. उष्णतेमुळे नागरिकांना घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी लागत आहे.
राज्यातील कोकण विभागातही यंदा उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली आहे. उत्तर कोकणातील अनेक भागांमध्ये तापमानात बरिचशी वाढ झाली असून त्याठिकानी उष्ण व कोरडे हवामान कायम आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
Temperature News Heatwave in Maharashtra: अकोल्यात ४०.७° तापमान, राज्यात उन्हाचा तडाखा वाढला
विदर्भातील तापमानाने नुकताच ४० अंशांचा टप्पा ओलांडला आहे. अकोला या ठिकाणी राज्यातील सर्वाधिक तापमान ४०.७ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. त्यासोबतच अमरावती येथे ३९.८ अंश आणि चंद्रपुरच्या ब्रह्मपुरी येथे ४०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दिलेल्या या सर्व शहरांमध्ये दुपारच्या वेळेत उष्णतेचा प्रचंड तडाखा जाणवत असून नागरिकांनी दुपारच्या वेळी बाहेर जाणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दिल्या गेलेल्या हवामान तज्ज्ञांच्या मते, तत्कालिन वातावरणात आर्द्रता कमी असून सूर्यकिरणांचा प्रभाव हा जास्त असल्यामुळे तापमान झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर काही भागांमध्ये वाऱ्याचा वेग कमी असल्याने उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे. पुढील काही दिवस राज्यातील बहुतांश भागात तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे उष्णतेच्या या वाढत्या लाटेमुळे आरोग्याच्या समस्या देखील वाढू शकतात. त्यामुळे नागरिकांनी अश्या वातावरणात भरपूर पाणी पिणे, व हलके आणि सैल कपडे परिधान करणे तसेच दुपारच्या वेळी थेट उन्हात जाणे टाळावे, असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि बाहेर काम करणाऱ्या कामगारांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
दरम्यान, राज्यातील तापमानाचा पारा पुढील काही दिवस आणखी वाढू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.
