Aurangzeb कबरीवरून Nagpur च्या शिवाजी चौकात दोन गटात दंगल; परिस्थिती नियंत्रना बाहेर!

Nagpur च्या शिवाजी चौकात दोन गटात Aurangzeb कबरीवरून दंगल;

Aurangzeb कबरीवरून Nagpur च्या शिवाजी चौकात दोन गटात दंगल; परिस्थिती नियंत्रणाबाहेर! नेमका वाद कशावरुन झाला पहा सर्व अपडेट !

Nagpur मध्ये दोन गटांमध्ये तणाव: दगडफेक आणि जाळपोळ

नागपूर: नागपूरच्या शिवाजी चौकात 17 मार्च रोजी सायंकाळी मोठा तणाव निर्माण झाला राज्यामध्ये सुरू असनार्या औरंगजेब कबरीच्या प्रकरनावरुन हे सर्व झालेले आहे. 17 मार्च रोजी राज्यात झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या व बजरंग दलाच्या औरंगजेब कबरीवरून करण्यात आलेल्या आंदोलनानंतर दोन गट आमनेसामने आले आणि घोषणाबाजीला सुरुवात झाली. यानंतर काही वेळातच परिस्थिती बिघडली आणि दोन्ही गटांमध्ये दगडफेक सुरू झाली. लगेच पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत जमावाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

नागपुरात नेमके  काय घडले? Nagpur Dangal News Today ?

17 मार्च रोजी सायंकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान औरंगजेब कबरी विरोधी आंदोलनकारी शिवाजी चौकात मोठ्या संख्येने लोक जमले होते. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या आंदोलनानंतर निर्माण झालेल्या रोषातून एक गट घोषणाबाजी करत होता. आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या गटानेही जोरदार घोषणाबाजी सुरू केली. पाहता पाहता हा वाद वाढला व दगडफेकीत बदलला.

Nagpur दंगलीनंतर पोलिसांची कारवाई ?

दोन गटामध्ये वाद पेटला असताना पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधूराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. यादरम्यास पोलिसांवर देखिल दगडफेक करण्यात आली व परिस्थिती नियंत्रनाबाहेर गेली. यामध्ये दगडफेकीत काही पोलीस अधिकारी, सैनिक आणि नागरिक जखमी झाल्याचे समजते. यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागपुरातील चिटणीस पार्क आणि महाल भागातही तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे.

Nagpur दंगलीत जाळपोळ आणि नुकसान ?

दोन्ही गटातील लोकानी दगडफेकीसह काही अराजक तत्वांनी वाहनांची जाळपोळ केली यामुळे बर्याच लोकाना आर्थिक नुकसानाला तोंड द्यावे लागले. यादरम्यान अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली व परिस्थितीवर नियंत्रन मिळविले तसेच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून या दंगलीदरम्यानचा पुढील तपास सुरू आहे.

दंगलीनंतर पुढील परिस्थिती ?

दंगलीनंतर पोलिसांनी जमावाला हटवून लावुन परिसर रिकामा करण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. नागरिकांना सुध्दा शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेनंतर नागपूरमध्ये अतिरिक्त सुरक्षा दलाच्या जवानांची तुकडी तैनात करण्यात आली आहे.

नागपुरातील शिवाजी चौकात व महाल परिसरात झालेल्या दंगलीमध्ये 15 पोलीस व काही नागरिक जखमीं झाल्याची माहिती समोर आलेली आहे, मात्र परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.

आम्ही या घटनेवर अधिक अपडेट्ससाठी आपल्याला माहिती देत राहू. नागपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

दंगली नंतर मुखमंत्री फडनविसांचे आव्हाहन !

आम्ही सातत्याने पोलीस प्रशासनाच्या सम्पर्कात आहोत व पोलीस प्रशासना नागरिकानी देखील सहकार्य करावे. नागपुर हे शांतताप्रिय व एकमेकांच्या सुख:दुखात सहभागी होनारे शहर आहे ही नागपुरची परंपरा कायम राहीली आहे. अश्या कठीण प्रसंगामध्ये आपण पोलिसांची मदत करा व अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आव्हाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनविस यानी केले.

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा….

YouTube Subscribe Now
फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप 
व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप 
टेलिग्राम जॉईन करा
Share Chat जॉईन करा

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *