top 10 hills station maharashtra in marathi

गर्मीपासून सुटका हवीय? भेट द्या महाराष्ट्रातील ‘या’ 10 अप्रतिम हिल्स स्टेशन !

महाराष्ट्रातील ‘या’ 10 अप्रतिम हिल्स स्टेशन

महाराष्ट्राचे तापमान हे दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे हा तान कमी व्हाया या उद्देशाने अनेक पर्यटक हिल्स स्टेशन ला जायला पसंती देतात. आज आपन अश्याच प्रकारच्या महाराष्ट्रामधील टॉप 10 हिल्स स्टेशन बद्दल जानुन घेऊया.

हि आहेत महाराष्ट्रातील उत्क्रुष्ठ थंड हवेचे ठिकाने ! जे तुम्हाला मंत्रमुग्ध करतील, महाराष्ट्रातील सर्वात जास्त प्रसिद्ध दाहा पर्यटन स्थळे ज्यांच्याबद्दल तुम्हाला माहित असायला हवे. महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक प्रकारचे थंड हवेचे ठिकाणे आहेत त्यामध्ये काही प्रमुख आहेत ज्यामध्ये महाराष्ट्रराज्यातील पालघर जिल्ह्यातील ठिकाण आहे

  1. जव्हार (Jawhar)

स्थान: पालघर जिल्हा

मुख्य आकर्षण: जयविलास पॅलेस, भूपतगड किल्ला,  हनुमान पॉइंट, सूर्यास्त बिंदू

जव्हार हिल्स स्टेशन ची विशेष: निसर्गरम्य वातावरणामध्ये आदिवासी संस्कृतीचा संगम जो आहे धनेश्वर येथुन काही अंतरावर आहे त्यापुढे काही दुरवर भुपादगढ़ किला आहे तेथेसुध्दा पर्यटक जातात सोबतच जयविलास पैलेस, हनुमान पॉइंट, आणि सूर्यास्त बिंदु जव्हार मधील सर्वात जास्त प्रमानामध्ये लोकांचे आकर्षनाचे ठिकाण आहे.

जव्हार थंड हवेच्या ठिकाणी कसे पोहचावे ?

जव्हार हे ठिकाण मुंबईपासून किमान 120 किमी अंतरावर आहे तर,  पुण्यापासून साधारपणे 270 किमी अंतर असेल.

कसे पोहोचाल? या ठिकानी ज्यान्याकरिता रस्ता मार्ग उपल्ब्ध आहे याठिकानी तुम्ही मुंबईहून NH-48 आणि जव्हार-पालघर मार्गे सहज पोहचू शकता.

रेल्वे मार्ग जव्हार ला जाण्यासाठी तुम्ही रेल्वेनेसुध्दा जाऊ शकता त्यासाठी तुम्ही जवळचे रेल्वे स्टेशन असलेले – इगतपुरी ज्या ठिकानावरुन हे ठिकाण (61 किमी) अंतरावर आहे.

बस सेवा: मुंबई आणि ठाण्याहून MSRTC बस उपलब्ध.

  1. तोरणमाळ (Toranmal)

स्थान: नंदुरबार जिल्हा

मुख्य आकर्षण: सातपुडा पर्वत रांगांमध्ये वसलेले ठिकाण,  हिरण्यकेशी नदीचा उगम,  प्राचीन शिवमंदिर,  लोटस तलाव.

तोरणमाळ थंड हवेच्या ठिकाणाची विशेष: महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे सुंदर हिल स्टेशन  आहे जे महाराष्ट्राच्या सातपुडा पर्वत रांगेमध्ये बसलेले आहे. नंदुरबार जिलहातील तोरनमाळ ठंड हवेचे ठिकाण हे उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध  आहे. या पर्वतामध्ये हिरण्यकेशी नदीचा उगम होतो व याठीकानी प्राचिन पुरातन शिवमंदिर सुध्दा आहे. त्याबोसतच येथील लोटस तलाव पर्यटकांच्या आकर्षनाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे. आपण या ठिकाणीसुध्दा निश्चित भेट देऊ शकता.

तोरणमाळ थंड हवेच्या ठिकाणी कसे पोहचावे ?

तोरणमाळ हे ठिकान मुंबईपासून 460 किमी अंतरावर तर पुण्यापासून साधारनपणे 490 किमी अंतरावर आहे. तर नंदुरबार रेल्वे स्टेशनपासुन किमान 76 कि.मी. अंतरावर आहे.

कसे पोहोचाल?

रस्ता मार्ग: या ठिकानी जायचे झाल्यास मुंबई-नाशिक-धुळे मार्गे NH-60 ने जाता येते. त्यासोबतच  रेल्वे मार्गाने जायचे झाल्यास जवळचे स्टेशन – नंदुरबार आहे जे साधारनपने (76 किमी) अंतरावर आहे.

बस सेवा: तोरणमाळ थंड हवेचे ठिकान जाण्यासाठी नंदुरबारहून स्थानिक बस किंवा टॅक्सी उपलब्ध आहे.

  1. अंबोली (Amboli)

स्थान: सिंधुदुर्ग जिल्हा

मुख्य आकर्षण: अंबोली धबधबा,  महादेवगड पॉइंट,  सूर्यास्त पॉइंट,  निसर्गरम्य जंगल आणि बायोडायव्हर्सिटी

अम्बोलीची विशेष: मॉन्सूनमध्ये धुके आणि धबधब्यांसाठी प्रसिद्ध अंबोली आहे. याचे स्थान सह्याद्रीच्या डोंगररानगांमध्ये आहे. यामध्ये अम्बोलीचा धबधबा सर्वाच्या आकर्षनाचा महत्वाचा व्युव आहे. सोबतच महादेवगढ़ पॉइंट आहे जेथे पर्यटक आनंदाने व भक्तिभावाने जाउन अभीवादन करतात सोबतच निसर्गाचा आनंद घेतात. अम्बोलीमध्ये आनखी निसर्गरम्य जंगल आहे जे सह्याद्रिची सुंदरता दर्शवीते. सनसेट पॉइंट अम्बोलीचा सनसेट पोईंट दर्शकांच्या मनाला स्पर्श करितो. अम्बोली हे ठिकाणा महारष्ट्रामध्ये सर्वपरिचीत आहे. आपण उन्हाळयंच्या सुटीमध्ये येथे जाउ शकता.

अम्बोली थंड हवेच्या ठिकाणी कसे पोहचावे ?

अम्बोली हे थंड हवेचे ठिकान  मुंबईपासून 490 किमी तर पुण्यापासून: 350 किमी अंतरावर आहे.

अम्बोली कसे पोहोचाल?

अम्बोली जाण्याकरिता रस्ता मार्ग उपलब्ध आहे. पुणे-कोल्हापूर-सावंतवाडी मार्गे NH-48 ने आपण अम्बोलीला पोहचू शकतो.

अम्बोली जान्याकरिता रेल्वे: जवळचे स्टेशन – सावंतवाडी रोड (30 किमी) अंतरावर आहे.

बस सेवा: कोल्हापूर आणि सावंतवाडीतून महाराष्ट्र परिवह्न च्या MSRTC बस उपलब्ध आहेत.

  1. लोणावळा (Lonavala)

स्थान: पुणे जिल्हा

मुख्य आकर्षण: भुशी डॅम,  राजमाची किल्ला, टायगर पॉइंट,  लोणावळा-खंडाळा घाट

विशेष: पावसाळ्यात अप्रतिम सौंदर्य

पावसाळ्यात आणि सर्व रुतुन्मध्ये लोनावाला महाराष्ट्र राज्यातील प्रसिध्द असे लोकप्रिय स्टेशन आहे. सुंदरता ऐतिहासिक किले प्राचीन भारतातील हिल स्टेशन खूब प्रसिद्ध आहे.

लोणावळा कसे पोहोचाल?

लोणावळाचे मुंबईपासून किमान : 83 किमी अंतर आहे, व पुणे जिल्ह्यापासुन हे अंतर 65 किमी चे आहे,

कसे पोहोचाल? लोणावळा जाण्याकरिता रस्ते तसेच रेल्वे मार्ग उपलब्ध आहेत.

रस्ता मार्ग:

रस्ते मार्गाने जावयाचे असल्यास मुंबईहून: मुंबई-पुणे एक्सप्रेसवे द्वारे (1.5 तास) मध्ये पोहचता यईल हा मार्ग निसर्गरम्य सानिध्यातील एक स्वर्गाचा अनुभव देतो.

पुण्याहून लोणावळा जावयाचे असल्यास : मुंबई-पुणे एक्सप्रेसवे (1 तास) पोहचता येईल.

रेल्वे: लोणावळा रेल्वे स्टेशन मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर आहे.

बस सेवा: मुंबई आणि पुण्याहून मनपा तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन सेवा MSRTC आणि खासगी बस सेवा उपलब्ध आहे.

  1. खंडाळा (Khandala)

जिल्हा: पुणे

खंडाळा हे ठिकाण मुंबईपासून साधारनता 81 किमी अंतरावर आहे, व पुण्यापासून: 69 किमी येवढे अंतर आहे.

खंडाळा कसे पोहोचाल?

रस्ता मार्ग:

खंडाळा जान्याकरिता मुंबईहून: मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मार्गे (1.5 तास) मध्ये पोहचता येईल त्यासोबतच तुम्ही जर पुण्याहून खंडाळा जात असाल तर मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मार्गाने (1 तास) लागेल. याव्यतिरिक्त

रेल्वे मार्गाने जर आपल्याला जावयाचे असेल तर लोणावळा स्टेशनवर उतरून टॅक्सी किंवा स्थानिक बसने खंडाळ्याला जाता येते. सह्याद्री पर्वताचा हा भाग पर्यटकांचे मन मोहुन टाकतो.

आपण जर बस सेवेचा उपयोग घेऊ इश्चित असाल तर : राज्य परिवहन मंडळाच्या म्हनजेच MSRTC आणि खासगी बस सेवा उपलब्ध आहेत.

  1. भीमाशंकर (Bhimashankar)

जिल्हा: पुणे

भीमाशंकर हे ठिकाण पुणे जिल्ह्यामध्ये स्थित आहे याचे मुंबईपासूनचे अंतर 220 किमी आहे तर, पुण्यापासून साधारनतहा 110 किमी अंतर आहे.

विशेष: देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग या ठिकानी उपलब्ध आहे त्यामुळे अनेक पर्यटक त्या उद्देशाने सुध्दा या ठिकानी येत असतात.

महाराष्ट्रातील प्रसिध्द असे अभयारन्य सुध्दा या ठिकानी आहे, तसेच प्रसिध्द भीमा नदीचा उद्गम सुध्दा या ठिकानावरुन होतो म्हनुन या ठिकाणाला विषेश असे महत्व आहे.

कसे पोहोचाल?

भीमाशंकर पोहचन्याकरिता अनेक मार्ग उपलब्ध आहेत :

भीमाशंकर जायला मुंबईहून: मुंबई-कल्याण-नाशिक महामार्ग → माळशेज घाट → भीमाशंकर जायला साधरत: (5 तास) लागतील तर हा प्रवास निसर्गाच्या सानिध्यातील एक अतुलनिय ठेवा आहे. त्यासोबतच तुम्ही पुण्याहूनजात असाल तर पुणे-राजगुरुनगर-भीमाशंकर मार्गे तुम्ही (3 तासात) पोहचू शकता.

भीमाशंकर जाण्याकरीता रेल्वे मार्ग : पुणे किंवा कर्जत रेल्वे स्थानकावर उतरून कॅब/बसने तुम्ही पुढिल प्रवास करु शकता.

या ठिकानी जान्याकरिता बस सेवा: पुणे आणि नाशिकहून MSRTC बस सेवा उपलब्ध आहेत.

  1. पंचगणी (Panchgani)

जिल्हा: सातारा

पांचगणी हे ठिकाण मुंबईपासून जवळपास 245 किमी अंतरावर आहे तर पुण्यापासून 100 किमी अंतरावर आहे, सातारा जिल्ह्याच्या ठिकाणापासुन 48 किमी अंतर आहे.

पांचगणी कसे पोहोचाल?

या ठिकानी जाण्याकरिता रस्ता मार्ग उपलब्ध आहे,  तुम्हि मुंबईहून जायचा विचार करित असाल तर मुंबई-पुणे-सातारा मार्गे NH-48 तुम्हाला या ठिकानी पोहचायाला साधारणपणे (5 तास) लागु शकतात. जर तुम्ही पुण्याहून पाचगनी जायचा विचार करित असाल तर पुणे–पंचगणी जायला तुम्हाला (3 तास) लागतील.

विशेष :- या ठिकानी रेल्वे मार्गाने जावयाचे झाल्यास पुणे रेल्वे स्थानकावर उतरून कॅब/बसने जाता येते. त्यासोबतच महाराष्ट्र सरकारच्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवा: पुणे आणि मुंबईहून MSRTC आणि खासगी बस सुध्दा उपलब्ध आहेत.

महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध असे लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे जे की पंचगनी नावाने प्रचलित आहे. महाराष्ट्रातील सतारा जिल्ह्यामध्ये एक ठंड हवेचे ठिकाना आहे. याठिकानाला विशेष असे सौंदर्य लाभलेले आहे.

या ठिकानी स्टोबेरी प्रसिध्द आहे तर त्यासोबतच राजापुरी प्राचिन लेनी याठिकानी आहे. अनेक प्रकारच्या गुफा, तलाव, नैसर्गिक सौदर्याने नटलेले हे ठिकान प्रर्यटकांचे मन प्रफुल्लीत करते.

  1. इगतपुरी (Igatpuri)

जिल्हा: नाशिक

इगतपुरी या ठिकानी जान्याकरिता अपल्याला मुंबईपासून हे ठिकाण 120 किमी अंतरावर आहे तर  पुण्यापासून साधरनपणे 250 किमी अंतरावर आहे. सोबतच नाशिक जिल्ह्यामधुन हे ठिकाण केवळ 46 किमी अंतरावर आहे.

इगतपुरी कसे पोहोचाल?

या ठिकानी जायला रस्ता मार्ग उपलब्ध आहे

मुंबईहून तुम्ही जायचा विचार करित असाल तर मुंबई-नाशिक महामार्गाद्वारे तुम्हाला NH-160 (2.5 तास) लागु शक्ततात. सोबतच तुम्ही जर पुण्याहून इगतपुरी जायचा प्लान करित असाल तर तुम्ही पुणे-नाशिक रोड NH-60 मार्गे तुम्हला या ठिकाणी पोहचायला (4.5 तास) लागु शकतात. तसेच तुम्ही जर नाशिक वरुन जायचा विचार करित असाल् तर तुम्हाला केवळ 1 तासामध्ये पोहचता यईल.

रेल्वे: इगतपुरी रेल्वे स्थानक मुख्य लोहमार्गावर असुन तुम्ही रेल्वे मार्गाने सुध्दा या ठिकाणी पोहचू शकता.

बस सेवा: मुंबई, पुणे आणि नाशिकहून राज्य परिवहन मंडळाच्या MSRTC बस सेवा उपलब्ध आहे.

  1. महाबळेश्वर (Mahabaleshwar)

जिल्हा: सातारा

महाराष्ट्रामधील सर्वात प्रसिध्द व लोकप्रिय असे ठिकाण जे मुंबईपासून 260 किमी व पुण्यापासून 120 किमी तसेच सातारा जिल्ह्यापासुन 56 किमी अंतरावर आहे.

महाबळेश्वर कसे पोहोचाल?

रस्ता मार्ग: या ठिकानी जायला रस्ते मार्ग उपलब्ध आहेत, तुम्ही जर मुंबईहून जायचा विचार करित असाल तर मुंबई-पुणे एक्सप्रेसवे → पुणे → वाई → महाबळेश्वर तुम्हाला साधारंपणे (5 तास) लागु शकतात आणि तुम्ही जर पुण्याहून: पुणे-सातारा रोड → वाई → महाबळेश्वर मार्गे जायचा विचार करित असाल तर तुम्हाला (3 तास) लागतील वर सातारा जिल्ह्यातुन तुम्ही जायचा विचार करित असाल तर तुम्हाला 1.30 तासामध्ये पोहचता येईल.

महाबळेश्वर ला जायला रेल्वे: पुणे रेल्वे स्थानकावर उतरून कॅब/बसने जाता येते सोबतच तुम्ही जर महाराष्ट्र परिवहन चा विचार करित असाल तर तुम्ही बस सेवा: पुणे आणि मुंबईहून MSRTC आणि खासगी बस उपलब्ध उपलब्ध आहेत.

विशेष :- महाबलेश्वर या ठीकांची 5 पर्यटन स्थळे विशेष आहेत मित्रानो महाबलेश्वर हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात असे सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थान आहे. महाबलेश्वर येथे तुम्हाला मनमोहन दृश्य संपूर्ण जगर्भारतील आठवनी स्मरण करुन महाबलेश्वर हे एक वेगळेच निसर्ग सौंदर्य, येथील नदी, भरधाव जानारे धबधबे, शिखर आणि सुंदर स्ट्रॉबेरी फॉर्म सुध्दा या ठिकानी उपलब्ध आहेत. महाबलेश्वर ठिकानाला नैसर्गिक सौंदर्य लाभलेले आहे सोबत अनमोल खजाना लाभलेला आहे. महाराष्ट्रातील बरेच पर्यटक पावसाळ्यामध्ये शुरुआतीला व दिवाळी करिता महाबलेश्वर ठिकानाला और अर्जुन भेंट देतात.

या ठिकानी सन सेट पोईंट, सावित्री नदी, हे ठिकान महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये विशेष असे परिचीत आहे.

  1. चीखलदरा (Chikaldara)

चिखलदरा  महाराष्ट्रातील विदर्भ क्षेत्रामध्ये येते विदर्भातील एक प्रचलीत पर्यटन स्थळ आहे. या ठिकानी  एकमेव कॉफी उत्पादन क्षेत्र असून विदर्भातील एकमेव हिल स्टेशन आहे. निसर्गरम्य डोंगररांगा, दाट जंगल, धबधबे आणि वाघोबा तसेच अन्य वन्यजीव पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे चिखल्दरा हे ठिकाण प्रसिध्द आहे.

जिल्हा: अमरावती

समुद्रसपाटीपासून या ठिकानाची उंची साधारनपणे 1118 मीटर इतकी आहे,

या ठिकानी विशेष प्रसिद्धी: चिखलदरा हे विदर्भातील एकमेव हिल स्टेशन आहे आणि इथून सातपुडा पर्वतरांगा स्पष्ट दिसतात. अमरावती ते चिखलदरा अंतर एकुन 100 किमी असेल या ठिकानी जायला किमान 2.30 ते 3 तास लागतील,

 

चिखलदऱ्याला कसे पोहोचावे ?

या ठिकानी जायला रस्तामार्गाने (By Road) उपलब्ध आहेत, तुम्ही अमरावती → अचलपूर → चिखलदरा (NH-361 मार्गे) चिखलदरा पोहचू शकता. याठीकानी जाण्याकरिता तुम्ही बस सेवेचा वापर करु शकता.

MSRTC बस: अमरावती आणि नागपूरहून नियमित बस सेवा उपलब्ध आहेत. तसेच खासगी वाहतूक: टॅक्सी किंवा स्वतःच्या गाडीनेही जाता येते.

रेल्वेने सेवा (By Train)

जवळचे रेल्वे स्टेशन अमरावती रेल्वे स्टेशन (100 किमी), बडनेरा जंक्शन (110 किमी) – येथे सर्व मोठ्या शहरांहून गाड्या उपलब्ध आहेत.

चिखलदऱ्याचे मुख्य पर्यटन स्थळे (Must-Visit Places in Chikhaldara)

भिमकुंड (Bhimkund) धबधबा – महाभारतातील भिमाने येथे पाणी प्यायल्याची कथा प्रसिद्ध आहे त्यामुळे पर्यटकासाठी हे ठिकाण विशेष महत्वाचे आहे.

  1. पंचबोल पॉइंट (Panchbol Point) – खोऱ्यात पाच वेळा आवाज प्रतिध्वनी होतो.
  2. गाविलगडचा किल्ला (Gavilgad Fort) – ऐतिहासिक आणि नेत्रदीपक किल्ला या ठिकानी आहे.
  3. सेमाडोह वाइल्डलाइफ सेंचुरी (Semadoh Wildlife Sanctuary) – वाघ आणि अन्य वन्यजीव जर तुम्हाला पाहावयाचे असतील तर ते तुम्ही या ठिकानी पाहू शकता.
  4. हरिकेन पॉइंट (Hurricane Point) – अप्रतिम निसर्गदृश्यांसाठी प्रसिद्ध आहे या ठिकानी तुम्ही निसर्गाचा आनंद घेऊ शकता.
  5. मोकडोको झरा धबधबा (Muktagiri Waterfall) – श्रावणात खास पाहण्यासारखा आहे.

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….

YouTube Subscribe Now
फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप 
व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप 
टेलिग्राम जॉईन करा
Share Chat जॉईन करा

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *